लोक एखाद्या आजाराने त्रस्त असतील तर त्यांना डॉक्टर अनेक आवडत्या पदार्थांपासून दूर रहायला सांगतात. लोकही नाक मुरडत मनात नसतानाही केवळ प्रकृतीसाठी आवडत्या पदार्थांना नाही म्हणतात. पण, ते किती काळ ते डायट फॉलो करतात ही एक शंकाच आहे.
जगात अनेक लोक असे आहेत जे हलकं फुलकं काहीतरी खाऊन जगतात. पण, आज आम्हाला एक अवलिया असा भेटलाय ज्याला पाहून तूम्हीही चक्रावून जाल. त्या साऊथ इंडियन अण्णाचे नाव बालकृष्णन असून ते गेल्या २४ वर्षांपासून केवळ नारळपाणी आणि खोबरं खात आहेत. असे करण्यामागील कारण विचारले असता बालकृष्णन सांगतात की, २४ वर्ष आधी मला एक आजार जडला होता. जी पोटात होणाऱ्या गॅससंबंधी होती. मला त्यामुले भयानक त्रास सहन करावा लागला. ज्यामुळे डॉक्टरांनी मला नारळपाणी पिण्यावर भर देण्यास सांगितले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने मी नारळपाणी पिण्यास सुरूवात केली. आणि मला ते आवडू लागलं. त्यानंतर त्यालाच पूर्णपणे अन्न बनवण्याचे मी ठरवले. आणि गेली २४ वर्ष मी ते डायट फॉलो करत आहे.
नारळपाणी पिणे सुरू करण्याआधी माझे आजार जास्त होते. मी रोजची कामेही नीट करू शकत नव्हतो. तेवढी एनर्जी नव्हती माझ्यात. पण, नारळपाणी पिणे सुरू केल्यापासून माझ्या शरीरारत उत्साह भरला आहे.
बालकृष्णन जेवण, चहा, नाश्ता काहीही करत नाहीत. ते केवळ नारळपाणी पितात आणि कोवळ शहाळ खातात. यामूळे त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. कारण, नारळात असलेले खनिजे आणि लोह तूमच्या शरीराला जगण्यासाठी आवश्यक असलेले पोषण देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.