तुम्ही त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोणते खोबरेल तेल वापरू शकता..
प्रत्येकाच्या घरी नारळाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. नाराळापासून अनेक गोड पदार्थ बनवले जातात. नाराळाचे पाणी (शहाळाचे पाणी) आरोग्यासाठी फायदेशीर असते. बऱ्याचवेळा नारळाचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. यासोबत त्वचा सुंदर बनवण्यापासून ते जखम बरी करण्यासाठी ही नारळ (नारळाचे तेल) सक्षम आहे असे सांगितले जाते. अनेकदा जखम नरम पडावी किंवा सुकण्यासाठी डॉक्टरही नाराळाचे तेल वापरण्यास सांगतात. आज या लेखात आम्ही तुम्ही त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोणते खोबरेल तेल वापरू शकता ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया... (coconut oil use for skin)
नवजात बाळाची मालिश करण्यासाठी
नवजात बाळाला नारळाच्या तेलाने मालिश करणे त्याच्या शरीरासाठी चांगले आहे. बाळासाठी ते एक चांगले मॉइश्चरायझर म्हणून काम करते. कुमारी नारळाच्या तेलाने बाळाचे मसाज केल्यास त्याचे हात पाय मजबूत होतात. नारळाचे तेल लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करत असते. त्यामुळे बाजारात असे अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत.
टाच बरी करण्यासाठी
जर तुमच्या टाचांना तडे गेले असतील तर खोबरेल तेल त्यांना बरे करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. भेगा पडलेल्या टाचांमधून अनेक वेळा रक्तस्त्राव होत असतो किंवा त्या दुखत असतात. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणून खोबरेल तेलातील दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म त्यांना बरे करण्यास मदत करतात. तुम्ही रोज रात्री टाचेला खोबरेल तेलाने मसाज करून झोपल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील.
मेकअप रिमुव्हर
नारळ तेल एक उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. कापसाचा वापर करुन तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता. यासाठी मेकअप काढण्याआधी तिथे खोबरेल तेल लावा. यानंतर कापसाच्या तुकड्याने मेकअप काढून टाका.
स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी
गर्भधारणेनंतर स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी खोबरेल तेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. दररोज एक चमचा तेल घेऊन स्ट्रेच मार्कच्या भागावर मसाज केल्यास काही प्रमाणात फरक दिसू शकतो. स्ट्रेच मार्क्सवर लावलेले हे तेल त्वचेत चांगले मुरेपर्यंत मसाज करत रहायचं आहे. या तेलामुळे स्ट्रेच मार्क्समध्ये होणारी खाजही कमी होते.
फुटलेल्या ओठांसाठी
हिवाळ्यात खोबरेल तेल फाटलेले ओठ हायड्रेट करण्यास मदत करते. कोरडी त्वचा बरी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. यापासून तुम्ही घरच्या घरी लिप बामही तयार करुन त्याचा वापर करु शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.