- डॉ. मलिहा साबळे, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, संस्थापक व संचालक - द हेल्दी माइंड
उच्च आत्मविश्वास असणं ही सकारात्मक मानसिक आरोग्य आणि कल्याणाची गुरुकिल्ली आहे. उच्च आत्मविश्वास तुम्हाला सामना करण्याची कौशल्ये विकसित करण्यास, प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यास आणि नकारात्मक गोष्टींना दृष्टिकोनात ठेवण्यास मदत करतो.
उच्च आत्मविश्वास म्हणजे केवळ स्वतःला आवडणे नव्हे, तर स्ततःवर प्रेम करणे, मूल्ये जपणे, प्रतिष्ठा देणे आणि आदरही प्रदान करणे आहे. सकारात्मक आत्मविश्वास म्हणजे तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे (शिकणे, साध्य करणे आणि योगदान देणे) आणि स्वतःहून गोष्टी करण्याची स्वायत्तता असणे.
दुसऱ्या शब्दांत, तुम्हाला स्वतःबद्दल कसे वाटते (आतून आणि बाहेर), तुम्ही काय विचार करता, तुमचे स्वतःचे काय मूल्यमापन आहे आणि तुम्ही इतरांशी कसे संबंध ठेवता हे म्हणजेही आत्मविश्वास. इतर लोक तुम्हाला कसे पाहतात, वागतात आणि तुमच्या मूल्यांकडे कसे पाहतात याच्याशीही ते संबंधित आहे. म्हणूनच ज्यांना अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतो, किंवा ज्यांच्यावर आघात झाला आहे (विशेषत: लहानपणी) त्यांना त्या काळात आणि भविष्यातही आत्मविश्व कमी होण्याचा त्रास होण्याची शक्यता असते.
आत्मविश्वास पूर्णपणे एका गोष्टीवर किंवा विचारांवर अवलंबून नाही. त्याऐवजी, व्यक्तिमत्व, कर्तृत्व, प्रतिभा, क्षमता, पार्श्वभूमी, अनुभव, नातेसंबंध आणि भौतिक शरीर; तसेच तुमची समज अशा सर्व गोष्टींतून तो बनलेला असतो. तुमचा आत्मविश्वास जास्त असेल, तर तुमच्याबद्दलचे सकारात्मक विचार नकारात्मक विचारांपेक्षा जास्त असतात आणि नकारात्मकतेमुळे तुमचा आत्मसन्मान कमी होत नाही. परिस्थितीनुसार उच्च आत्मविश्वासात देखील चढ-उतार होऊ शकतात.
मूलत:, उच्च आत्मविश्वास ही मनाची चौकट आहे, जी तुम्हाला तुमची ताकद साजरी करू देते, तुमच्या कमकुवतपणाला आव्हान देऊ देते आणि तुम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या जीवनाबद्दल चांगले वाटू देते. तुम्ही आत्मविश्वासाच्या समस्यांना सामोरे जात असाल, तर तो पूर्ववत करण्यासाठी या गोष्टी करा :
डॉक्टरांकडून घेतलेली थेरपी, उदाहरणार्थ, कॉग्निटिव बिहेविअरल थेरपी (CBT).
नकारात्मक विचार स्वीकारा आणि ओळखा.
शारीरिक हालचालींना प्राधान्य द्या.
आत्म-करुणा सराव.
आवाहन
या सदरासाठी फोटो पाठवताना फोटो चांगल्या क्वालिटीचे असावेत. फोटोबरोबर नाव (देवनागरीत) आणि मोबाईल क्रमांकही नक्की लिहावा. फोटो पाठवण्यासाठीचा पत्ता : maitrin@esakal.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.