LPG Cylinder Safety Tips: स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅसची शेगडी. या गॅसच्या शेगडी शिवाय स्वयंपाकच होवू शकत नाही. जरी अलिकडे घरांमध्ये इंडक्शन किंवा ओव्हन आणि मायक्रोव्हेव Microwave आले असले तरी अद्याप तरी भारतात मुख्य स्वयंपाक किंवा अनेक पदार्थ हे गॅसवरचं शिजवले जातात. Cooking Gas Safety Tips in Marathi
किचनमधील Kitchen ही गॅसची शेगडी जितकी स्वयंपाकासाठी Cooking महत्वाची आहे. तितकीच त्या शेगडीची काळजी घेणं तसचं ती वापरताना खरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. Kitchen hacks Marathi How do you turn on a gas oven with match
स्वयंपाक करताना गॅसची Cooking Gas शेगडी वापरत असताना तुमची एक छोटीशी चूक देखील जीवावर बेतू शकते. प्रत्येकाची शेगडी वापरण्याची पद्दत वेगवेगळी असते. अनेक लोक स्वयंपाक Cooking झाल्यावर किंवा रोज झोपताना गॅसचा स्विच सिलेंडरजवळही बंद करतात. तर काहीजण केवळ गॅसचा स्विच बंद करतात. Kitchen hacks
अनेकजण गॅस ऑन करण्यासाठी लायटर वापरतात तर काही माचिसचा उपयोग करतात. गॅस तुम्ही कसा वापरत आहात याचा थेट संबध सेफ्टी म्हणजेच सुरक्षिततेशी आहे. काही चुकांमुळे मोठी दुर्घटना घडू शकते. यासाठी पाहुयात गॅस शेगडीशी संबंधीत काही सेफ्टी टिप्स
गॅस स्टोव सुरु करण्यासाठी काही सेफ्टी टिप्स
जर तुम्ही काडेपेटीच्या मदतीने गॅस ऑन करत असाल तर आधी काडीपेटी पेटवावी त्यानंतर गॅस ऑन करावा. अनेकजण काडेपेटी पेटवण्याआधीच गॅस ऑन करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडतो. यामुळे तुमचा हात जळण्याची शक्यात असते.
काडेपेटीने जर गॅस पेटवणं शक्य झालं नाही तर लगेचच गॅस बंद करून काडेपेटी विझवावी. शिवाय दोन मिनिटं थांबून नंतरच पुन्हा गॅस पेटवण्याचा प्रयत्न करावा.
माचिस एवजी कायम लायटरने गॅस पेटवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे जोखीम कमी होते.
गॅस पेटवण्यासाठी त्याची सेटिंग कमी असावी म्हणजेच गॅस लोवर ठेवून माचिस किंवा लायटरने तो सुरु करावा. त्यानंतर तुमच्या हिशोबाने तुम्ही हाय, मीडियम फ्लेम करू शकता. gas stove safety
हे देखिल वाचा-
यासोबतच अनेकदा गॅस नियमितपणे वापरला जात असल्याने त्याचे बर्नर खराब होतात. या बर्नरमध्ये कार्बन किंवा अन्नाचे कण साचल्याने नळीतून येणारा LPG योग्य रित्या बर्नरपर्यंत पोहतच नाही. बऱ्याचदा गॅस लिक झाल्याचा वासही येतो. यामुळे देखील मोठा धोका निर्माण होवू शकतो. यासाठीच बर्नर वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.
बर्नरमधून गॅस पास होण्यास अडचण होत असेल तर लगेचच तो बदलण्याची आवश्यकता नाही सुरुवातीला तुम्ही काही ट्रीक वापरून घरच्या घरी बर्नर स्वच्छ करु शकता.
विनेगरने करा बर्नर स्वच्छ- यासाठी एका वाडग्यात अर्धा कप विनेगर आणि दोन चमचे मीठ घ्या. हे मिश्रण बर्नरवर टाका. त्यानंतर हे बर्नर तुम्ही १०-१५ मिनिटांसाठी या मिश्रणातच बुडवून ठेवू शकता. त्यानंतर बर्नर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे बर्नर नव्या प्रमाणे चमकू लागतील, लक्षात घ्या बर्नर पूर्ण वाळल्यानंतर पुन्हा बसवा. lighters safety tips
लिंबाने करा बर्नल स्वच्छ- लिंबाच्या मदतीने तुम्ही बर्नर अगदी नव्या प्रमाणे चमकवू शकता. यासाठी एका वाडग्यात गरम पाणी घेऊन त्यात रात्रभर बर्नर डुबवून ठेवा.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी लिंबाच्या फोडीवर थोडं मीठ घेऊन त्याने बर्नर स्क्रब करा. यामुळे बर्नर स्वच्छ होण्यास मदत होईल. पाण्याच्या प्रेशरखाली बर्नर धुवा. यामुळे त्यात अडकलेली घाण निघण्यास मदत होईल. How to clean gas burner
बर्नरप्रमाणेच अनेकदा गॅसच्या लायटरमध्ये देखील पाणी गेल्याने तो योग्यरित्या चालत नाही. यामुळे अनेकदा बराच वेळ गॅस ऑन ठेवावा लागतो. परिणामी मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर येतो. यासाठी लायटर स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे.
लायटरमध्ये पाणी गेलं असल्यासं तो २-३ तासांसाठी उन्हामध्ये ठेवू शकता. याचसोबत स्वयंपाक करत असताना एखाद्या गरम भांड्याच्या झाकणावर लायटर ठेवल्याने त्याचील पाणी वाळून तो योग्य प्रकारे काम करेल.
अशा प्रकारे किचनमध्ये स्वयंपाक करत असताना सगळ्यात आधी गॅसची शेगडी आणि त्यासंबंधीत सुरक्षेची काळजी घेणं हे अधिक गरजेचं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.