Covid19 And Diabetes esakal
लाइफस्टाइल

Covid19 And Diabetes: ‘हे’ आजार असलेल्या रुग्णांना देखील Covid-19 चा जास्त धोका? काय म्हणतात डॉक्टर

सर्वाधिक करोनाबाधित हे मधुमेह असलेले रुग्ण आहेत

Pooja Karande-Kadam

 Covid19 And Diabetes: दोन वर्षांमागे आलेल्या एका भयानक रोगाच्या साथीने सगळ्या जगाची लोकसंख्या कमी केली. अनेक लोकांना जीव गेला तर अनेक त्यातून बाहेर पडूनही आजाराने ग्रासलेले आहेत. मधुमेह असलेल्या रुग्णांचे या विषाणूने सर्वाधिक बळी घेतले आहेत. भारताला मधुमेह अर्थात डायबिटीज असलेल्यांचा देश म्हटले जाते. त्यामुळेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंदरात वाढ होत आहे.

सर्वाधिक करोनाबाधित हे मधुमेह असलेले रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासन सुद्धा मधुमेह असलेल्या रुग्णांना वारंवार अधिकाधिक काळजी घ्यायला सांगत आहे. पण केवळ मधुमेहच नाही तर इतर गंभीर आजार असलेल्या लोकांनाही डॉक्टर काळजी घेण्यास सांगतात.

देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोविड-19 चा कहर पाहायला मिळत असून यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरस म्युटेट होत आहे आणि यामुळे नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत हजारो लोकांना कोविड संसर्गाचा फटका बसला असून सरकारनेही आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनारुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. सर्वांनी आवश्यक ती पावले उचलली तर परिस्थिती लवकर आटोक्यात येऊ शकते. त्यामुळे सुरूवातीपासूनच काळजी घेणं गरजेच आहे. केवळ सरकारनेच नाही तर आपणही वैयक्तीक पातळीवर काळजी घेणं गरजेच आहे.

दिल्ली मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल बन्सल म्हणतात की, जर लोकांनी कोविड संसर्गाबाबत खबरदारी घेतली नाही तर पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडू शकते. बहुतेक लोकांना कोविडप्रतिबंधक लस देण्यात आली आहे आणि त्यांच्यात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.

अशा परिस्थितीत कोविडचा सामना करण्यासाठी काही प्रमाणात मदत होईल. मात्र, गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्यांनी अत्यंत खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा लोकांना संसर्ग झाला तर तो त्यांच्यासाठी घातकही ठरू शकतो. हे टाळण्यासाठी लहान मुले आणि वृद्धांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

या रुग्णांनी काळजी घ्यावी

  • मधुमेह आणि रक्तदाबाचे रुग्ण

  • टीबी आणि दम्याच्या रुग्ण

  • हृदयरोग आणि एचआयव्ही रुग्ण

  • कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असलेले रूग्ण

आधीच आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी कोविड संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क घालणे आवश्यक आहे. हात वारंवार सॅनिटाइझ करावेत किंवा साबणाने धुवावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घ्यावी, असा सल्ला डॉक्टर बन्सल यांनी दिला.

या तीन गोष्टी लक्षात ठेवा

  • रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर सकस आहार घ्यावा.

  • कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास योग्य डॉक्टरांकडून उपचार करावेत.

  • संसर्गाबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नये.

गंभीर आजार असताना कोरोना झाला तर...

डॉक्टरांच्या मते, गंभीर आजार असताना करोना विषाणुची लागण झाली. तर, अजिबात वेळ न दवडता आपली टेस्ट करून घ्यावी आणि त्यावर ताबडतोब उपचार सुरु करावे. मधुमेहाच्या रूग्णांनी सगळ्यात पहिला ताण तणाव घेणे बंद करावे नाहीतर धोका अजून वाढेल. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि योग्य औषधांचे सेवन करावे. जितकी सुरक्षा या काळात रुग्ण घेतील तितका त्याची जीव वाचण्याची शक्यता वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT