लाइफस्टाइल

कोरड्या खोकल्यामुळे त्रस्त आहात का?, 'या' घरगुती उपायांचा वापर करुन पाहा

सकाळ डिजिटल टीम

हवामान बदलले की अनेकांना कोरडा खोकला आणि सर्दी असे काही साथीचे आजार उद्भवू लागतात. अशावेळी खोकताना किंवा संपूर्ण पोटात आणि बरगड्यांमध्ये वेदना जाणवतात. दरम्यान, यातून तुम्हाला आराम हवा असेल किंवा कोरड्या खोकल्याचा बराच काळ त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून कोरड्या यापासून आराम मिळू शकतो.

कोरड्या खोकल्यासाठी घरगुती उपाय -

मध

कोरड्या खोकल्यावर मध हा एक रामबाण उपाय आहे. हे केवळ घसा आणि घश्यात खवखवणेच दूर करत नाही तर घशातील संसर्गही बरा करते. यासाठी अर्धा ग्लास कोमट पाण्यात २ चमचे मध मिसळून प्या. यामुळए घशा फ्रेश होईल आणि तुम्हाला घसा रिकाम झाल्यासारेख वाटेल.

गरम पाण्यात मध टाका

कोरड्या खोकल्याच्या उपचारासाठी अर्धा ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्या. मधाचे नियमित सेवन केल्यास कोरड्या खोकल्यामध्ये आराम मिळतो. अनेकदा तज्ज्ञही असे पाणी पिण्याचा सल्ला देतात.

आले आणि मीठ

कोरडा खोकला झाला असेल तर अशावेळी आले आराम देते. यासाठी आल्याचा एक गोळा ठेचून त्यात चिमूटभर मीठ टाकून दाढाखाली दाबून धरावे. त्यानंतर हा रस हळूहळू तोंडात जाऊ द्यावा. 5 मिनिटे तोंड धुतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यावे याचा घश्यासाठी फायदा होईल.

हळदीचे दूध

हळदीचे दूध प्यायल्यानेही घशाला आराम मिळतो. यासाठी 1 ग्लास दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रोज प्या. याशिवाय वाफ घेणेही घश्यासाठी खूप फायदेशीर असेत. त्यामुळे बऱ्याचवेळा घशा खवखवत असेल तर वाफ घेतली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI-Hindenburg Row: सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांना क्लीन चिट; 4 महिन्यांचा उर्वरित कार्यकाळही करणार पूर्ण

"तुला भेटता नाही आलं पण..." अश्विनी एकबोटेंच्या सुनेची सासूच्या आठवणीत भावूक पोस्ट ; "आज जिथे तू वावरलीस..."

AUS vs IND: ...अन् हा जसप्रीत बुमराहचा सामना करणार! Steve Smith ची विकेट पाहून ऑस्ट्रेलियालाच आलंय टेंशन

Latest Maharashtra News Updates Live : दिवाळीत धावणार पुणे ते नागपूर शिवनेरी बस

सत्य घटनांनी प्रेरित अल्ट्रा झकास ओरिजिनलची पहिली सीरिज ‘IPC’; 'या दिवशी होणार प्रदर्शित

SCROLL FOR NEXT