Curly Hair Care Tips Dinesh Oak
लाइफस्टाइल

Curly Hair Care Tips : कुरळ्या केसात माझ्या...;कर्ली हेअरची अशी घ्या काळजी!

curly hair care tips: कुरळ्या केसांची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे? का ते पहा!

Pooja Karande-Kadam

Curly Hair Care Tips: सुंदर आणि निरोगी केसांचं स्वप्नं तर प्रत्येकाचं असतं. मग ते केस सरळ असोत वा कुरळे. जास्तीत जास्त लोकांना सरळ आणि मुलायम केस खूप आवडतात. पण कुरळ्या केसांचा लुकही अप्रतिम दिसतो.

ज्या मुलींचे नैसर्गिकरित्या केस सरळ असतात, त्यांनाही आपले केस कुरळे असावेत असं वाटत असतं. त्या मुलींना केस कुरळे करून घेण्यासाठी वेगवेगळ्या मशीन्सची मदत घ्यावी लागते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला तिच्या कुरळ्या केसांचा अभिमान आहे. ती नेहमी केस मोकळे सोडून त्यांचा रूबाब करत असते. पण अनेक मुली त्यांच्या कोरड्या, कुरळे आणि निस्तेज दिसणाऱ्या कुरळे केसांमुळे त्रासलेल्या असतात. अनेकदा त्यांचे कर्लही व्यवस्थित दिसत नाहीत.

कारण, त्या मूली केसांची नीट काळजी घेत नाहीत. केस कोरडे आणि कुजबुजलेले दिसू लागतात. जर तुम्हाला कुरळे केस सुंदर बनवायचे असतील तर एक आयकॉनिक लाईफस्टाईल तूम्ही फॉलो करायला हवी.

टॉवेलने पुसू नका

कर्ली केस धुतल्यानंतर फ्लफी टॉवेलने कधीही पुसू नयेत. असे केल्याने कर्ल खराब होतात आणि केसांमध्ये कोरडेपणा येतो. टॉवेलऐवजी, मऊ फॅब्रिकच्या टी-शर्टने आपले केस कोरडे करा. असे केल्याने कुरळ्या केसांचे नैसर्गिक तेल टिकून राहते.

कुरळे केस विंचरताना हे वापरा

केस ट्रिम करा

तीन महिन्यातून एकदा केस ट्रिम करणे आवश्यक आहे. ट्रिम केल्याने, डॅमेज आणि स्प्लिट एंड्स सहज काढले जातात आणि केसांची वाढ वाढते, तसेच केस कोरडे दिसत नाहीत.

केस धुणे

आठवड्यातून साधारण 2 ते 3 वेळाच तुम्ही कुरळे केस धुवू शकता. कुरळे केस धुताना महत्त्वाची बाब लक्षात ठेवा आणि ती म्हणजे केस धुण्याआधी तुमच्या कुरळ्या केसांना व्यवस्थित तेलाने मालिश करा. त्यामुळे तुमच्या केसांमधील कोरडेपणा निघून जाईल.

केसांना तेल लावावं की नाही

कुरळ्या केसांसाठी तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी तेल गरम करून त्याने मालिश करायला हवं. यासाठी तुम्ही बदाम तेल अथवा नारळाचं तेल गरम करून तुमच्या केसांना लावा. कुरळ्या केसांवर संध्याकाळी तेल लावून रात्रभर ते मुरायला ठेवा आणि सकाळी डोक्यावरून शँपू लावून आंघोळ करा

कॉटन पिलो कव्हर वापरू नका

जर तुमचे केस कुरळे असतील तर उशीसाठी कॉटन पिलो कव्हर कधीही वापरू नका. कॉटन पिलो कव्हर्स केसांचे नैसर्गिक तेल आणि आर्द्रता शोषून घेतात. त्यामुळे सिल्की पिलो कव्हर वापरा. जेणेकरून केसांचे नुकसान, कोरडेपणा आणि कुरळेपणापासून संरक्षण करता येईल.

कंडिशनर लावण्याची चूक करू नका

शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावणे आवश्यक आहे. पण केस कुरळे असतील तर साधे कंडिशनर लावल्याने केसांना मुलायमपणा येत नाही. कुरळ्या केसांमध्ये नेहमी लीव्ह इन कंडिशनर वापरावे. जेणेकरून केसांमध्ये ओलावा बंद होईल आणि केस चमकदार दिसू लागतील.

कंगवा परफेक्ट असावा

कुरळे केस दिवसातून एकदा किंवा दोनदा नाही तर किमान 6-7 वेळा केस विचरणे आवश्यक आहे. जेणेकरून केस एकमेकांत अडकून त्यात गुंता होऊ नये. केस विंचरल्याने केसांचा नैसर्गिक पोत कायम राहतो आणि कर्ल अधिक चांगले दिसतात. ज्यामुळे तुमचे केस आटोपशीर राहतात आणि परफेक्ट कर्ल्स दिसतात.

कुरळ्या केसांसाठी हे हेअर मास्क ठरतील बेस्ट

  • केळी आणि बदाम तेल

सर्वात पहिले तुम्ही 1 केळं मिक्सरमधून वाटून घ्या हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढा. आता यामध्ये बदामाचं तेल दोन चमचे मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट साधारण 30 मिनिट्स आपल्या केसांना लावून ठेवा. त्यानंतर तुमचे केस शँपूने धुवा.

  • अंडी आणि दही

एका कपामध्ये दोन चमचे अंड्याचा सफेद भाग घ्या. त्यामध्ये दोन चमचे दही मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्ही तुमच्या ब्रशच्या सहाय्याने केसांना लावा. साधारण अर्धा तास हे केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा.

  • कोरफड आणि नारळ तेल

दोन चमचे नारळाच्या तेलामध्ये 4 चमचे कोरफड जेल आणि 3 चमचे दही मिसळून त्याची पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावून साधारण अर्ध्या तासासाठी केस तसेच ठेवा. त्यानंतर केस थंड पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT