Beauty Tips: तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आलेत की तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य डल पडतं. डार्क सर्कल आल्यानंतर तुम्ही केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरत डार्क सर्कल घालवण्याचा प्रयत्न करता. तुमचे डार्क सर्कल या प्रोडक्ट्सने जात असले तरी तुमच्या त्वचेला ते नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे होममेड रिमेडी वापरणे कधीही फायद्याचे. चला तर जाणून घेऊया डार्क सर्कल घालवण्यासाठीची होममेड क्रिम.
डार्क सर्कलसाठी मधाची क्रिम गुणकारी ठरते. मध चेहऱ्यासाठी चागलं असतं. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही मधाचा वापर केला जातो. जाणून घेऊया मधाने डार्क सर्कल घालवण्याचा उपाय.
क्रिम बनवण्यासाठी लागणारं साहित्य
मध
कॉफी
विटॅमिन ईचे तेल (Health)
अशी बनवा क्रिम
एका बाउलमध्ये मध घ्या.
तीन चमचे मध घ्या आणि त्यात एक चमचा कॉफी पावडर टाका.
एक चमचा विटॅमिन ईचं तेल त्यात टाकून मिक्स करून घ्या.
तुमची होममेड क्रिम रेडी असेल.
दीर्घकाळ ही क्रिम टीकवण्यासाठी एका डब्यात तुम्ही तिला फ्रिजमध्येही ठेवू शकता.
क्रिम लावण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या
आधी चेहरा पाण्याने धुवून घ्या. साफ चेहऱ्यावर ही क्रिम अप्लाय करा.
क्रिमला डोळ्यांखाली लावा आणि काही वेळ मसाज करा.
ही क्रिम रात्री लावा जेणेकरून तुमच्या स्किनवर घाण किंवा धूळ बसणार नाही.
तुमचे डार्क सर्कल जात नाही तेव्हापर्यंत ही क्रिम रोज लावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.