Dark Circles Removal Packs esakal
लाइफस्टाइल

Dark Circles Removal Packs : चेहऱ्यावरील काळ्या वर्तुळांना लपवू नका, घरगुती उपायांनी त्यांना कायमचेचं घालवा!

Pooja Karande-Kadam

Dark Circles Removal Packs : आजकाल अगदी १५ वर्षाच्या  मुलांपासून ते चाळीशीच्या वयाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांच  डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्याचा त्रास जाणवत आहे.  बदललेली जीवनशैली आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे कमी वयात वयस्कर दिसण्याची वेळ आज प्रत्येकावर आली आहे. याचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होत आहे.

काळी वर्तुळे आल्याने उजळ चेहरा निस्तेज दिसू लागतो. आजकाल बऱ्याच लोकांना या गोष्टीचा सामना करावा लागतो. त्यावर ठोस असा काही उपायही नाही. त्यामुळे त्यावर काय उपाय करायचा हे आपण पाहुयात.

डोळ्यांच्या खाली आलेली काळी वर्तुळे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय कामी येऊ शकतात. त्यामुळेच आपण घरीच बनवता येतील असे काही उपाय पाहुयात.

डोळ्यांखाली काळी वर्तुळं का येतात?

- टीव्ही, मोबाईल जास्त बघणं ही सवय डोळ्याभोवती काळी वर्तुळं येण्यास कारणीभूत ठरते. रात्री अपरात्री मोबाईल वापरणे, त्यासाठी चष्मा न वापरणे यानेही काळी वर्तुळं दाट होतात. 

- पुरेशी झोप न होणं, तसेच ताण तणाव, थकवा यामुळे काळी वर्तुळं येतात. शास्त्रीयदृष्ट्या मनुष्याला साधारण ७ तासाची झोप घेण गरजेचे आहे. 

- अनुवांशिकतेमुळे काळी वर्तुळं आली असतील तर ती मुळासकट काढून टाकणे शक्य नसते. त्यामुळेच ते काही उपचारांनी फिकट करता येऊ शकतात.   

- सौंदर्य प्रसाधने हि जशी वरदान आहेत तसेच ती शापही ठरत आहेत. डोळ्यांसाठी केला जाणारा हेवी मेकअप  डोळे काळे पडण्यास कारणीभूत ठरत आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये केमिकलचा होणारा अतिवापर तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिकच बिघडवण्याचे काम करत आहेत. 

- केवळ बाह्य गोष्टीच नव्हे तर आपण घेत असलेल्या आहाराचाही  परिणाम होत असतो. आहारातील मिठाचं सेवन अधिक केल्यानेही काळी वर्तुळं येतात.  

- शरीरात सकस अन्न आणि पाण्याची योग्य मात्रा जाणे  आवश्यक आहे. शरीरात पाणी कमी पडल्यास डिहायड्रेशन होऊन अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळेही डोळ्याभोवती काळी वर्तुळं निर्माण होतात. 

- धूम्रपानाची सवय असल्यास कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो, त्यामुळे त्वचा काळी पडते, खराब होते. त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेखालील रक्तप्रवाह बिघडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात. 

घरगुती उपाय

ऍलोव्हेरा जेल

तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, चेहरा उजळ बनवायचा असेल तर कोरफड तुम्हाला मदत करेल. काळी वर्तूळे घालवण्यासाठी आलेली घालवण्यासाठी कोरफडीच्या पानांवर असलेले जेल काढून ते मिक्सरला फिरवून पेस्ट बनवा. त्यानंतर कोरफड जेल दोन तास फ्रिजला ठेवा. त्यानंतर ते थंड झालं की चेहऱ्याला लावा आणि अर्ध्यातासाने चेहरा धुवून टाका

शुद्ध नारळ तेल

या प्रयोगासाठी तुम्हाला शुद्ध नारळाचं तेल घ्यायचं आहे. कापसाच्या दोन गोळ्यांवर  हे तेल लावा. आणि ते कापसाचे गोळे तुमच्या डोळ्यांवर ठेवा. तीन तासांनंतर तुमच्या असे लक्षात येईल की, कापसावरील तेल मुरले आहे. त्यानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ धुवू शकता.

कॉफी पावडर

डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तूळे घालवण्यासाठी तुम्ही कॉफी पावडरचाही वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही कॉफी पावडर घेऊन त्यात बदाम किंवा नारळाचं तेल घाला. हे मिश्रण तुमच्या डोळ्यांभोवती लावा. त्यानंतर १५ मिनिटांनी तुमचा चेहरा धुवून टाका.

टोमॅटो रस

डोळ्यांभोवतीची त्वचा उजळण्यासाठी टोमॅटोची पेस्ट आणि लिंबूचा पॅक उपयोगी पडतो. टोमॅटोच्या पेस्टमध्ये लिंबूचे दोन थेंब टाका. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

दही आणि लिंबू

एका वाटीत दोन चमचे दही घ्या. त्यात दोन चमचे लिंबूचा रस टाका. आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिट तसंच राहूद्या. थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला काळ्या वर्तूंळांच्या जागी निखर सौंदर्य दिसेल.

बटाटा आणि मध

एक कच्चा बटाटा घेऊन त्याचा रस काढून घ्या. त्यामध्ये एक चमचा मध घाला. हे तयार मिश्रण कापसाच्या बोळ्याने चेहऱ्याला लावा आणि थोड्यावेळाने स्वच्छ करा.

ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग्स

ग्रीन टीकडे एक हेल्दी पेय म्हणून पाहिले जाते. ग्रीन टी दोन प्रकारे येते. एक म्हणजे सॅशे आणि पावडर असे. त्यातील सॅशेचे पुड्या चहा बनवून फेकून दिल्या जातात. पण काळी वर्तूळे घालवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

रोहित, मैं आपसे बोहोत प्यार करती हूँ! मुलीच्या प्रपोजनंतर Rohit Sharma लाजला पण, पत्नी रितिका... Video Viral

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Latest Maharashtra News Updates: छ्त्रपती संभाजीनगर येथून ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना - पालकमंत्री अब्दुल सत्तार

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE updates - वोटिंग ट्रेंड्समध्ये निक्कीने सूरजला टाकलं मागे

SCROLL FOR NEXT