साथरोगाने सर्वांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. जीवन पूर्णपणे बदलले. नातेसंबंधांबरोबरच डेटिंगवरही (Dating) मोठा परिणाम झाला. या काळात ऑनलाइन डेटिंगने चांगली प्रगती केली. घरात नीरस वाटायला लागल्यामुळे लोकं खुले नातेसंबंध (Relationship) शोधू लागले आहे. 2021 मध्ये, विवाह आणि नातेसंबंधांमध्ये बरेच वाद आणि समस्या निर्माण झाल्या. काहींचे संबंध सुधारले, काहींचे बिघडले. पण आता अनेकांना बदल हवा आहे. 2022 मध्ये डेटिंग डायनॅमिक्समध्ये बदल दिसेल. लोक अधिक संधींसाठी तयार आहेत. ते आता जीवनातील आणि नातेसंबंधांचे नवीन पैलू स्वीकारण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक तयार आहेत. 2022 मधील डेटिंग ट्रेंडवर एक नजर टाकूया.
1) ओपन रिलेशनशीप (Open relationships)
2022 मध्ये ओपन रिलेशनशीपमध्ये वाढ दिसून येऊ शकते. कारण अनेक जोडपी सक्रियपणे त्यांच्या संमतीने, त्यांच्या नातेसंबंधाच्या किंवा लग्नाव्यतिरिक्त पार्टनर शोधत आहेत. ग्लीडन या विवाहबाह्य डेटिंग अॅपच्या मते, 55% लोकांना असे वाटते की, एकपत्नीत्व ही एक सामाजिक रचना आहे. तर 47% पेक्षा जास्त लोकांनी उघड केले आहे की ते त्यांच्या जोडीदाराच्या संमतीने ओपन रिलेशनशीप ठेवू इच्छित आहेत. याचा अर्थ असा की जोडपी एकमेकांना (एकत्र किंवा स्वतंत्रपणे) दूर जाण्याची शक्यता आहे असा सांगतात. हा प्रकार अल्प कालावधीसाठी वापरला जाणार असून जे नातेसंबंध आहेत ते खराब होऊ नयेत असेही जोडप्यांना वाटते.
नात्यात गोपनियता (Privacy In Relationships)
अनेक लोकांना आपली माहिती सोशल करणे आवडते. पण याबाबत लोकं गोपनीयता ठेवू इच्छितात. कुटुंबासह अनेक महिने लॉकडाउन केल्यानंतर, गोपनीयता ही एक लक्झरी बनली आहे ज्याला लोक आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व देत आहेत. कारण प्रत्येकजण सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या कृतीत हस्तक्षेप करतो. त्यामुळे आपले विश्व गोपनीय ठेवण्याची गरज अधिकाधिक महत्त्वाची बनली आहे, डेटिंगसारख्या संवेदनशील विषयाबाबत ही गरज अधिक महत्वाची आहे.
छंदासाठी वेळ (Hobby Dates)
लोकांनी डेटिंग वेबसाइटवर त्यांचे छंद आणि आवड त्यांच्या भागीदारांसोबत शेअर करण्यात मोठ्या प्रमाणात इंटरेस्च दाखवला आहे. डेटिंग अॅप बंबलच्या मते, भारतातील प्लॅटफॉर्मवरील 52% युजर्स त्यांच्या छंदांनुसार डेटिंगचे नियोजन करतात. तुम्हाला आधीपासून आवडत असलेले काहीतरी करून पोस्ट-लॉकडाउनमध्ये डेटिंग करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. यातून तुम्ही दोघे एकमेकांचा छंद जोपासू शकता.
रिलेशनला पुन्हा न्याय (Resetting The Button Back To One)
लोक आता आपले रिलेशन पुन्हा रीसेट करण्यावर भर देत आहेत. साथीच्या आजारादरम्यान अनेक बदलांसह, लोक इतरांना एकापेक्षा जास्त संधी देण्यास शिकले आहेत. बंबलवरील 71% लोक नवीन वर्षात त्यांच्या डेटिंग प्रवासात रीसेट बटण दाबण्यासाठी तयार आहेत. अनेकांना अशा जोडीदाराचा शोध घ्यायचा आहे जो भावनिकदृष्ट्या उपलब्ध असेल आणि गरजेच्या वेळी काळजी घेऊ शकेल.
डेटींग अॅपवर मैत्री (Friendships on dating apps)
डेटिंग आणि नातेसंबंध बाजूला ठेवून, लोक मैत्री करण्यासाठी डेटिंग अॅपचा वापर करत आहेत. मैत्री ही अनौपचारिक आणि डेटिंग दरम्यान कुठेतरी असते. यामुळे अविवाहितांना गप्पा मारण्याची, संवाद साधण्याची आणि प्रत्यक्षात डेटिंग न करता निरोगी नातेसंबंध निर्माण करण्याची संधी मिळते. हा ट्रेंड २०२२ मध्ये वाढू शकतो!
व्हर्च्युअल डेटिंग नेहमीच महत्वाचे राहील (Virtual dating will always remain significant)
साथीच्या काळात सोशल मीडिया आणि ऑनलाइन वेबसाइट्सच्या मदतीने लोक एकमेकांशी कनेक्ट झाले. Quack Quack, डेटिंग प्लॅटफॉर्मनुसार, पारंपारिकपणे डेटिंगच्या तुलनेत जवळपास 73% टक्के अविवाहित लोक नेहमी आभासी डेटिंगला प्रेम करण्यासाठी दबावाचा मार्ग म्हणून पाहतात. 75% टक्के लोक म्हणतात की ते एक तणाव-बस्टर असू शकते, तर अंदाजे 61% टक्के लोकांना वाटते की ऑनलाइन कनेक्शन करणे खूप सोपे आहे, ज्यामुळे नातेसंबंध वाढतात. ऑनलाइन डेटिंग मुळात एकटेपणाची समस्या सोडवते. डेटिंग प्लॅटफॉर्म संकटाच्या वेळी नातेसंबंध निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधने आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.