Datta Jayanti 2023 esakal
लाइफस्टाइल

Datta Jayanti 2023 : दत्त भक्तांची पंढरी असलेल्या गाणगापूरच्या वेशीत गेल्यावर त्याच मार्गाने परत का येऊ नये?

गाणगापूरीत आहे आश्चर्यचकीत करणारा भस्माचा डोंगर

Pooja Karande-Kadam

Datta Jayanti 2023 :

हजारो किलोमीटरचे अतर कापत जेव्हा वारकरी पंढरीत पोहोचतात. इतके अंतर ते सहज कापतात, ते केवळ विठ्ठलाच्या दर्शनाची आस धरून. तसेच, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्तांचा वास ज्या तिर्थस्थानी आजही आहे, ते गाणगापूर लाखो दत्त भक्तांसाठी पंढरीच आहे.

दत्त महाराजांनी जशा लीला महाराष्ट्रात केल्या तशाच त्या कर्नाटकातही दाखवल्या. कर्नाटकातील दत्त महाराजांचे प्रसिद्ध असे तिर्थस्थान असलेल्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूरमध्ये आजही अनेक चमत्कार घडतात. तिथे भूत उतरवली जातात, तिथे रोज दुपारी १२ वाजता साक्षात दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी येतात, अशा भाविकांच्या श्रद्धा आहेत.

अशीच आणखी एक आख्यायिका गाणगापूराबाबत सांगितली जाते. ती म्हणजे, गाणगापूर गावाच्या वेशीत एकदा का प्रवास केला. की परतीचा मार्ग दुसऱ्या गावाच्या दुसऱ्या टोकाने करावा. त्याच मार्गाने करू नये, असे का सांगितले जाते. यामागे काय कथा आहे, हे आपण जाणून घेऊयात.  

साक्षात दत्त महाराज गाणगापूरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपाशिर्वाद प्राप्त करुन घ्या असा महाराजांचा संदेश आहे.

याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा-अमरजा संगमावर करुन दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरुपाने कोणत्याही वेषात उपस्थित असतात, असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असूनसुद्धा श्री गुरुंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्र्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे.

गाणगापूरातील दत्तांचे मोहक रूप

दत्तांच्या पवित्र निर्गुण पादूका

श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापूरातून निघताना आपल्या पादूका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत. परंतू निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रुपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो. येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे.

गाणगापूरातील अष्टतीर्थ

गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे होत –१) षट्कुल तीर्थ, २) नृसिंह तीर्थ, ३) भागीरथी तीर्थ, ४) पापविनाशी तीर्थ, ५) कोटी तीर्थ, ६) रुद्रपाद तीर्थ, ७) चक्रेश्र्वर तीर्थ व ८) मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात.

गाणगापूरीतील आश्चर्यचकीत करणारा भस्माचा डोंगर

भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात, त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाणा द्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलीत आहे.

श्रीक्षेत्र गाणागापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली आहे. आजपर्यंत लक्षावधी श्रीदत्तभक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेउनही ही भस्माची टेकडी आहे तशीच आहे.

श्रीक्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिशाच्च बाधा हटते. दृष्टिबाधा नाहीशी होते. रोगराई नाहीशी होती. हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे. परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात. संन्यासीवृंद भस्मस्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात.

वेशीतून बाहेर का जाऊ नये

या प्रश्नावर जाणकार असे सांगतात की, गाणगापूर क्षेत्र हे पावन आहे. साक्षात दत्तप्रभूंचा वास इथे आहे. जिथे देव आहेत तिथे दानव उभेही राहू शकत नाहीत. तर तुम्ही गाणगापूरात प्रवेश केला की, तुमच्या मागे लागलेली पिडा तिथेच जळून राख होते.

जेव्हा तुम्ही घरी परतण्यासाठी त्याच वेशीतून परत फिराल. तर त्याच पिडा पुन्हा तुमच्यासोबत येतील,अशी मान्यता आहे. त्यामुळेच जिथूल गावात प्रवेश कराल त्याच मार्गाने माघारी परतू नका, असे तिथे जाणाऱ्यांना सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

SCROLL FOR NEXT