Daughter Day 2024 Sakal
लाइफस्टाइल

Daughter Day 2024: तुमच्या मुलीला 'सेल्फ डिपेंडेंट' बनवण्यासाठी लहानपणीच शिकवा 'या' गोष्टी, होतील यशस्वी

पुजा बोनकिले

Happy Daughter Day 2024: दरवर्षी २२ सप्टेंबरला राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. समाजात महिलांना खास स्थान आहे. त्या वेगवेगळ्या भूमिका निभवत असतात. कधी आई तर कधी बहिण, कधी पत्नी तर कधी मुलगी. प्रत्येकाचं वेगळ व्यक्तिमत्व असते. यात मुलेचे वेगळे स्थान आहे. याच कन्यच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो. तुमच्या मुलींना आयुष्यात यशस्वी पाहायचे असेल तर पुढील गोष्टी लहानपणीच शिकवल्या पाहिजे.

स्वत:ची काळजी घेणे

मुलींना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यांना स्वत:ची काळजी घ्यायला शिकवा. जेव्हा मुली स्वत:ची काळजी घ्यायला शिकल्या की सर्व कामे नीट करू शकतील. कारण आरो्य निरोगी असेल तर कामावर लक्ष केद्रिंत करता येईल.

विचार करून निर्णय घेणे

तुमच्या मुलींना कोणताही निर्णय घेताना विचार करून घ्यायला शिकवावे. ज्यामुळे कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही. मुलींना वेळेचे महत्व समजून सांगावे. परिस्थिती आणि वेळ समजून घेऊन निर्णय घेण्यास शिकवावे. पुढे जाऊन आयुष्यात योग्य निर्णय घेतल्याने यश मिळेल.

स्वतंत्र राहण्याचा अधिकार

ज्याप्रमाणे मुले स्वतंत्र जगतात,जगण्याचा आनंद घेतात त्याचप्रमाणे तुमच्या मुलीला समान अधिकार असला पाहिजे. जोपर्यंत मुली जगाला समारे जात नाही तोपर्यंत गज कसे आहे समजणार नाही. यामुळे त्यांना स्वतंत्र फिरण्याचा अधिकार द्यावा.

स्वत: निर्णय घेणे

तुमच्या मुलीला स्वत: चे निर्णय स्वत: घ्यायला शिकवा. यामुळे योग्य निर्णय घेण्याची सवय लागेल. तसेच समाजात वारवरतांना योग्य आणि अचुक याची निवड करता येईल.

चुकीच्या गोष्टींना विरोध करणे

तुमच्या मुलींना चुकीच्या गोष्टींना विरोध करायला शिकवावे. ज्या गोष्टी चुक आहेत त्याची समज द्यावी आणि विरोध करायला शिकवावे. तसेच मुलींना लहानपणांपासूनच हक्कासाठी लढायला शिकवावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सासऱ्यांनी प्रेमविवाह केला, गावकऱ्यांचा संताप, पंचायतीने सुनेला धक्कादायक शिक्षा सुनावली, महाराष्ट्रातील घटना

Nashik Crime News : शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वारांना लुटणारे दोघे गजाआड! चोरीचे मोबाईल अन 12 दुचाकी हस्तगत

Ulhasnagar Crime : बांगलादेशी पॉर्न स्टार महिलेचा उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांकडून पर्दाफाश

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah : "मला शो सोडायचाय म्ह्णून निर्माते त्रास देतायत" ; तारक मेहता...मधील सोनुने केला आरोप

Latest Maharashtra News Updates: २८ सप्टेंबरला भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT