Deep Breathing Benefits esakal
लाइफस्टाइल

Deep Breathing Benefits: दिर्घ श्वास घेण्याचा मधुमेही रूग्णांना जास्त फायदा, कसा ते जाणून घ्या

दिर्घ श्वासोच्छवासामुळे ताणतणावही कमी होतो

Pooja Karande-Kadam

Deep Breathing Benefits :

मधुमेह हा जगभरातील सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. मधुमेही रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. 2025 पर्यंत जवळपास 134 दशलक्ष लोक मधुमेही होतील, असा अंदाज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वर्तवला आहे. आजकाल घरोघरी मधुमेहाचे रूग्ण वाढत आहे. रक्तातील साखर वाढण्याची अनेक कारणे आहेत. जीवनशैली आणि आनुवंशिक घटक तुमच्या रक्तातील साखरेवर परिणाम करतात. यामुळे अनेकदा तुमच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते.

तुमची जीवनशैली, जंक फूड, व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा आणि ताणतणावाचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब आणि तणाव कमी करण्यासाठी काही गोष्टी बदलणे गरजेचे आहे. या दोन्ही समस्यांवर नियंत्रण ठेवण्याचा एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे दिर्घ श्वास घेण्याचे टेक्निक होय.

तज्ञांच्या मते, दररोज 10-15 मिनिटे दीर्घ श्वास घेतल्याने तुम्हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. आणि रक्तदाब कमी करता येतो आणि हृदयविकाराचा धोका टाळता येतो. तर हे कसे शक्य होते आणि ते हा व्यायाम कसा करायचा या बद्दल अधिक जाणून घेऊयात.  

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने हृदय, मूत्रपिंड आणि नसा यांसारख्या शरीराच्या अनेक अवयवांचे गंभीर नुकसान होऊ शकते. हे तुमच्या शरीराच्या फुफ्फुसांच्या आरोग्यावर आणि श्वास घेण्याची क्षमता प्रभावित करू शकते.

निरोगी आहार आणि दैनंदिन व्यायाम आपल्या श्वासोच्छवासाची पद्धत प्रभावीपणे सुधारू शकतात. दीर्घ श्वास घेतल्याने तणाव कमी होण्यास आणि तुमच्या शरीरातील ग्लुकोज व्यवस्थापन सुधारण्यास मदत होते.(Weight Loss Tips)

दीर्घ श्वासोच्छ्वास मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवू शकतो?

तज्ञांच्या मते, दररोज 10-15 मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दीर्घ श्वासोच्छवासामुळे तुमच्या शरीरातील यंत्रणा देखील नियंत्रणात राहते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते आणि तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन संतुलित होते. (Diebetes)

दिर्घ श्वासामुळे ताण कमी होतो

  • दिर्घ श्वासोच्छवासामुळे ताण कमी होतो, स्नायू शिथिल होतात.

  • धमन्या मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह चांगला होतो.

  • हे तुमचा रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या कमी करण्यास देखील मदत करते.

  • तुम्ही दीर्घ श्वास घेता तेव्हा तुमचे शरीर जास्त ऑक्सिजन वापरते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढू शकते. (Deep Breathing Benefits For Diebetes)

  • पचन सुधारण्यास मदत होते आणि कॉर्टिसॉल नावाच्या तणाव संप्रेरकाचे उत्पादन कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT