Ashadhi Wari 2024: Sakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024: तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, पोलिसांचा कडक बंदोबस्त अन् सीसीटीव्हीचाही सोहळ्यावर वॉच

पुजा बोनकिले

Ashadhi Wari 2024: आषाढी वारीला सुरूवात झाली असून अनेक ठिकाणांहून पालख्या पंढरपुरच्या दिशेने निघाल्या आहेत. आज संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरकडे रवाना होणार आहे. यानिमित्त्याने वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी शहरात पाच हजार पोलिसांचा बदोबस्त तैनात करण्यात आला असून यंदा सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर सोहळ्यावर असणार आहे.

पोलिसांची करडी नजर

देहूत ३ सहायक पोलिस आयुक्त, ६ पोलिस निरिक्षक, ३४ सहायक पोलिस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक , ४०० पोलिस अंमलदार एवढा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवेशद्वारात धातूशोधक यंत्र लावले आहेत. पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त आहे. विसावा असणाऱ्या ठिकाणी सुरक्षा लक्षात घेऊन मोजक्याच लोकांना सोडण्यात येणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच

यंदा पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असणार आहे. यामुळे चोरट्यांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. तसेच गर्दीवर लक्ष ठेवणे देखील सोपे होणार आहे. चौदा टाळकरी कमान व देहू आळंदी रस्त्यावरील देहूतील प्रवेशद्वार कमानीजवळ अनगडशहावली बाबा दर्गा येथे वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई हादरली! झोपेतच मृत्यूनं कवटाळलं, भीषण आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, लहान मुलांचाही समावेश

मुन्ना यादव कुटुंबात राडा, एकमेकांवर हल्ला; धंतोली ठाण्यात दोन्ही गटांत गोंधळ, परिसरात तणाव

Solar Storm: गंभीर इशारा! अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता; भारतावर किती होईल परिणाम?

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

SCROLL FOR NEXT