हे पीठ गोड पदार्थ, मिठाई बनवण्यासाठी वापरले जातात.
सणासुदीच्या काळात भेसळयुक्त वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या वेळी मैदा आणि तांदळाच्या पिठाचीही भरपूर खरेदी होते. हे पीठ गोड पदार्थ, मिठाई बनवण्यासाठी वापरले जातात. पण तुम्हाला माहितेय का, मैदा आणि तांदळाच्या पिठामध्ये बोरिक अॅसिड वापरून अधिक नफा कमावला जातो, ज्यामुळे आपल्या आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते.
FSSAI (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया) ने अलीकडेच आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात बोरिक अॅसिड असलेले मैदा आणि तांदळाचे पीठ ओळखण्याच्या टिप्स देण्यात आल्या आहे. या छोट्या टिप्स तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
मैदा किंवा तांदळाच्या पिठामध्ये बोरिक अॅसिड शोधण्यासाठी, टेस्ट ट्यूबमध्ये मैद्याचे पीठ 1 ग्रॅम घ्या. यानंतर, त्यात 5 मिली पाणी घालून चांगले मिसळा. यानंतर, टेस्ट ट्यूबमध्ये कॉन्सनट्रेटेड एचसीएल चे काही थेंब टाका. यानंतर या द्रावणात (सॉल्यूशन) टरमरिक पेपर ठेवा. जर मैदा शुद्ध असेल तर कागदाच्या रंगात कोणताही बदल होणार नाही. पण जर त्या कागदाचा रंग लाल झाला तर समजून घ्या की त्यात भेसळ तयार झाली आहे.
बोरिक अॅसिडचे तोटे...
बोरिक अॅसिड हे एक केमिकल आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. एका अहवालानुसार, बोरिक अॅसिडमुळे ओटीपोटात दुखणे, ताप, मळमळ, त्वचेवर लाल ठिपके किंवा जळजळ होणे, पेल्विक इनफ्लेमेटरी आणि उच्च रक्तदाब अशा समस्या वाढू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.