Diabetes Health Tips: पेरू खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत. पेरू खाल्ल्याने पचनक्रीया सुधारते, मधुमेह कमी करते, रक्ताची पातळी वाढवते, त्वचा चमकदार करते याहून अधिक फायदे पेरूचे आहेत. पेरू खाण्याबाबत तुम्हाला डॉक्टरही काहीवेळा सल्ला देत असतील.
पण तुम्हाला हे माहिती नसेल की, भारतात झपाट्याने वाढणाऱ्या एका आजारावर रामबाण उपाय पेरूची पाने आहेत. पेरूची पाने खाऊन मधुमेहावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. होय, हे खरं आहे. मधुमेहाची सुरूवात झाल्याचे कळताच तुम्ही जर या पानांचे सेवन केले तर हा रोग आटोक्यात आणला जाऊ शकतो.
मधुमेह आपल्या शरीरासाठी किती घातक आहे?
मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. ही समस्या शरीरात निर्माण होणाऱ्या इन्सुलिनला अडथळा निर्माण होण्याने उद्भवते. किंवा शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यानेही उद्भवते. इन्सुलिन हा घटक स्वादुपिंडामध्ये तयार होत असतो. हे इन्सुलिन आपल्या शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज किंवा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं.
पेरूच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म
पेरूच्या पानांमध्ये एँटी-इंफ्लेमेटरी, एँटीमाइक्रोबियल आणि एँटी-ऑक्सीडेंट्सचे गुणधर्म असतात. त्याचबरोबर ही पाने व्हिटामिन बी आणि सीचे चांगले स्त्रोत मानले जाते.
पेरूची पाने खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
पोटदुखी थांबते
पेरूच्या पानांचे अनेक फायदे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ते चांगले पेनकिलर आहे. आजही ग्रामिण भागात दात दुखत असेल तर पेरूच्या पानाची पुरचुंडी दातात धरली जाते. तर पोटात दुखत असेल तरी या पानांचा रस पिला जातो.
कोलेस्टेरॉल कमी करते
रक्तवाहिन्यांमध्ये जमलेले कोलेस्टेरॉल रूग्णासाठी जीवघेणंही ठरू शकतं. त्यामुळं अशा रूग्णांनी जास्त काळजी घ्यावी लागते. तुम्हालाही असाच काहीसा आजार असेल तर तुम्हीही पेरूच्या पानांचा डायटमध्ये समावेश करू शकता. ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते.
वजन कमी करण्यात फायदेशीर
आजकाल अनेक लोक वजन कमी करण्यासाठी झटत आहेत. कारण, वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डायट, योगा क्लासेस आणि जिम करूनही वजन कमी होत नाही. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर पेरूची पाने मदत करू शकतात.
केसांच्या समस्याही करतात दूर
आजकाल केस गळती आणि केसांना फाटे फुटण्याच्या समस्या वाढल्या आहेत. या केसांच्या समस्यांवरही पेरूची पाने फायदेशीर आहेत.
कशी खाल पेरूची पाने
चांगल्या परिणामासाठी तुम्ही रोज सकाळी घेत असलेल्या चहामध्ये पेरूची पाने टाकू शकता. हा चहा तुम्हाला लवकर स्लीम होण्यात मदत करेल. यासाठी पेरूची काही पाने एका कप पाण्यात उकळून घ्या आणि एका कपमध्ये गाळून प्या. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. हा चहा पिण्याची योग्य वेळ म्हणजे जेवणानंतर. पेरूची पाने धुऊन स्वच्छ करून सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.