Diabetic Patient esakal
लाइफस्टाइल

Diabetic Patient : मधुमेह असणाऱ्या महिलांपेक्षा पुरूषांना किडनी आणि हृदयविकाराचा धोका अधिक?

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या 25 टक्के पुरुषांमध्ये पायाशी संबंधित समस्या आढळून आल्या

सकाळ डिजिटल टीम

Diabetic Patient : 

मधुमेहाच्या रुग्णांबाबत एक नवीन संशोधन समोर आले आहे. महिलांच्या तुलनेत मधुमेह असणाऱ्या पुरुषांना  त्रास होतो त्यांना गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, असे सिडनी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.  

संशोधकांच्या मते, मधुमेहामुळे होणारे हृदय, पाय, मूत्रपिंड आणि डोळ्यांचे आजार स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये जास्त दिसून आले. या संशोधनात 25,713 लोकांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त होते आणि ते टाइप १ किंवा टाइप २ मधुमेहाने ग्रस्त होते.

या सर्वेक्षणाद्वारे, या लोकांमध्ये मधुमेहामुळे विकसित झालेल्या आरोग्य समस्यांचे 10 वर्षे निरीक्षण केले गेले, त्यानंतर हा डेटा त्यांच्या वैद्यकीय नोंदींशी जोडला गेला.

हृदयाशी संबंधित आजारांबद्दल संशोधकांना असे आढळून आले की 25,713 लोकांच्या अभ्यासात, 44 टक्के पुरुषांना स्ट्रोक आणि हृदय विकारासह व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत असल्याचे आढळून आले. तर, 31 टक्के महिलांना या आजारांचा धोका असल्याचे आढळून आले.

विद्यापीठाचे हे निष्कर्ष 'जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थ'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

संशोधकांनी मूत्रपिंड आणि पायाच्या आजारांबद्दल सांगितले की, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या 25 टक्के पुरुषांमध्ये पायाशी संबंधित समस्या आढळून आल्या. तर, महिलांमध्ये ही संख्या 18 टक्के आहे.

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या 35 टक्के पुरुष किडनीच्या आजाराचे बळी असल्याचे आढळून आले. तर, मधुमेहाने ग्रस्त महिलांमध्ये हा आकडा 25 टक्के आढळून आला. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या पुरुषांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका 51 टक्के जास्त होता. 

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या पुरुषांमध्ये किडनीचा आजार होण्याचा धोका 55 टक्के जास्त असल्याचे आढळून आले आहे टक्के तथापि, डोळ्यांच्या आजाराच्या बाबतीत मधुमेही पुरुष आणि स्त्रियांमधील फरक खूपच कमी असल्याचे आढळून आले. संशोधनानुसार, 57 टक्के पुरुष आणि 61 टक्के महिलांना डोळ्यांच्या समस्या असल्याचे आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT