Navratri Diet Plan: देशभरात शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा 3 ऑक्टोबरपासून हा सण सुरू होत आहे. या दिवसांमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. देवीचे काही भक्त 9 दिवस उपवास करतात, तर काही लोक नवरात्रीच्या पहिल्या आणि आठव्या दिवशी उपवास करतात.
धार्मिक मान्यतेसह उपवासाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. नऊ दिवस उपवास केल्याने शरीरातील डिटॉक्सिफिकेशन आणि वाढलेले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. काही लोक या काळात भरपूर अनेक स्वादिष्ट गोड आणि तेलकट पदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते. यामुळे नवरात्रीत वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या आहार योजना करायची असेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.
नवरात्रीत वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर नऊ दिवस आहारात भाज्यांचा समावेश करावा. शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक भाज्यांमध्ये असतात. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि वजन नियंत्रणात राहते. यासाठी रोज आहारात भाज्या सॅळड स्वरूपात खाऊ शकता किंवा सूप बनवू शकता.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत तुम्हाला वजन की करायचे असेल तर कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने जीवनसत्वे, अॅसिड असतात. यामुळे वजन कमी करू शकता.
नवरात्रीत उपवास करताना दिवसभर थोड्या अंतराने खाद्यपदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही. त्यामुळे दिवसभर नियमित अंतराने हलकी फळे खात राहावे. त्यामुळे वजनही नियंत्रित राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
नवरात्रीत नऊ दिवस भरपूर पाणा प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही. तसेच भुकेची भावना कमी होईल आणि शरीर देखील हायड्रेटेड राहील. जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही तर त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. यासाठी पाण्याऐवजी लिंबू पाणी, नारळ पाणी, भाज्यांचा रस आणि फळांचा रस घेऊ शकता. यामुळे वजन नियंत्रणात राहील.
नवरात्रीच्या दिवसांमध्ये पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यासाठी शेंगदाणे, मखाणा, काजू यासारखे पदार्थ खावे. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही आणि दिवसभर तुमच्या शरीरात ऊर्जा राहील.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.