Coffee Recipe : कॉफी भारतीयांच्या आवडीच्या पेयाच्या यादीत अव्वल स्थानावर पोहचली आहे. कॉफीचे असंख्य प्रकार मिळतात. अर्थात बाहेर गेल्यानंतर प्रत्येक वेळी ही कॉफी आपल्याला परवडेलच असे नाही. उन्हाळ्यात तर संपूर्ण कुटुंब घरी असते. पाहुणे येतात. बच्चेकंपनी काही वेगळे करून दे असा हट्ट करतात. मग घरीच वेगवेगळी कॉफी करा आणि सुटीतही कॉफीचा आनंद घ्या.
कॉफी मगमध्ये १ चमचा कॉफी पावडर,१ चमचा साखर आणि थोडे गरम पाणी टाकून फेटा. कॉफीचा रंग बदलेपर्यंत फेटत रहा. दुसर्या बाजूने दूध गरम करा. दूधाला एकदम उकळी येऊ द्यायची नाही. कॉफी मगमध्ये हळूहळू दूध टाका आणि कॉफीला वर येऊ द्या. हवे असेल तर चॉकलेट सिरप घालून सर्व्ह करा.
पातेल्यात डार्क चॉकलेट्स तुकडे घ्या. यामध्ये जरा दालचिनी पावडर, १ चमचा कॉफी पावडर, १ चिमूट जायफळ पावडर, १ चमचा साखर थोड्या दूधात घाला. मंद आचेवर ही कृती करताना चॉकलेट वितळेल. नंतर कॉफी मगमध्ये हे मिश्रण ओता. यावर पुन्हा गरम दूध टाकून सर्व्ह करा.
१ कप घट्ट दूधाला हलकेच गरम करा. यामध्ये २० ग्रँम डार्क चॉकलेट टाकून १ चमचा साखर घाला. थोडे थोडे दूध बाजूने गरम करा. काचेच्या जार किंवा शेकरमध्ये गरम दूध टाका आणि फेस येईपर्यंत हलवा. कॉफी मगमध्ये चॉकलेट, दूध घालून वरून क्रीम घालून सर्व्ह करा.
२ चमचे कोको पावडर, १ चमचा साखर, गरम पाण्यात मिसळा. यामध्ये वरून उकळलेले दूध टाका. वरून कोको पावडर घालून सर्व्ह केल्यावर या कॉफीचा लूक बदलतो.
कपात २ चमचे कॉफी पावडर आणि १ चमचा साखर टाका.ही कॉफी हार्ड कॉफी आहे. दूधाचा वापर केवळ मिश्रण फेटण्यासाठी होते. कॉफी आणि साखर एकत्र होईल इतके अगदी दोन-तीन थेंब दूध टाका. कॉफीचा रंग बदलेपर्यंत फेटा. नंतर गरम पाणी घाला. नुसते पाणी आवडत नसेल गरम दूध घाला.
पाणी गरम करा. मंद आचेवर अर्धा चमचा कॉफी पावडर, विलायची पावडर, दालचिनी पावडर, बारीक किसलेले अद्रक टाकून पाणी उकळू द्या. यामध्ये नंतर चवीप्रमाणे साखर टाका. नंतर दूध टाका आणि मसाला कॉफी तयार. ही कॉफी करताना मंद आचेवर करावी आणि दूध शेवटी घालावे.
ही कॉफी दोन प्रकारे करता येते. पाव कप पाण्यात कॉफी, साखर, विलायची पावडर घालून उकळी येऊ द्यावी. गँसवरून उतरवून यामध्ये थंड दूध घालावे. मिक्सर जारमध्ये मिश्रण टाकून एकजीव करावे. नाहीतर नुसते थंड दूध, साखर, आइस क्यूब, कॉफी पावडर मिक्सरमधून किंवा शेकरमधून फेस येईपर्यंत हलवली तरी कोल्ड कॉफी तयार होते.
(संकलन : नीरा देवकत्ते)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.