World Disabled Day 2023  esakal
लाइफस्टाइल

World Disabled Day 2023 : कोणाचा अपघात, तर कोणी जन्मजात दिव्यांग, तरीही अटकेपार झेंडा रोवणाऱ्या चारचौघी

स्वतःच्या अपंगत्वावर मात करुन, जिद्दीने हवे ते करू शकते, याचे उदाहरण म्हणजे या दिव्य पराक्रम करणाऱ्या महिला

Pooja Karande-Kadam

World Disabled Day 2023 :

अपंगत्व असणं ही केवळ मनाचे खेळ आहेत. अपंगत्व असल्याने कोणाची प्रगती थांबू शकत नाही. ज्याला खरंच प्रगती करायची आहे ती तो करतोच, हेच या महिलांनी सिद्ध केले आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर काही महिलांनी हे सिद्ध केले आहे की, अपंगत्व कधीही त्यांच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही.

अपंगत्वाचे कधीही आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवू दिले नाही. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा पाच यशस्वी महिलांची ओळख करून देणार आहोत, ज्या शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत, परंतु त्यांच्या आयुष्यात त्या यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या आहेत.

केवळ स्वत:चेच नाहीतर देशाचेही नाव उज्वल केले आहे. या महिला केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही तर मनोरंजन क्षेत्रातही यशस्वीपणे कार्य करत आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंग असूनही या आज लाखो महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. आज जागतिक दिव्यांग दिन आहे. यानिमित्त आपल्याला ज्यांचा सार्थ अभिमान वाटतो अशा तिला आपण सलाम करूयात.

सुधा चंद्रन

सुधा एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना आहेत. ज्यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. केरळमध्ये जन्मलेल्या या 50 वर्षीय अभिनेत्रीचा 16 वर्षांचा असताना अपघात झाला आणि तिच्या एका पायाला इजा झाली. उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिच्या पायाला आणखी दुखापत होऊन संसर्ग झाला. तिचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला.

लाकडी पायाच्या मदतीने तिने आपले अपंगत्व सुधारले आणि त्यानंतरही ती भारतातील सर्वात लोकप्रिय शास्त्रीय नृत्यांगना बनली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले परफॉर्मन्स देऊन ती जगभर लोकप्रिय झाली. या सर्वांशिवाय सुधा चंद्रन हे भारतीय टेलिव्हिजनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

 प्रीती श्रीनिवासन

तामिळनाडू अंडर 19 क्रिकेट संघाची कर्णधार प्रीती श्रीनिवासन देखील शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. एके दिवशी पोहताना तिच्या मानेपासून अर्धांगवायू झाला. मात्र त्यानंतरही तिने आपला प्रवास इथेच संपवली नाही. तर, त्यांच्या सोलफ्री संस्थेच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देण्याचे काम सुरू केले.

विशेषतः अपंग मुलींसाठी ती एक प्रेरणा आणि आशा म्हणून उदयास आली. तिने तिच्यासारख्या मुलींना आशेचा किरण दाखवून त्यांचे जीवन सुसह्य केले. ती त्यांना त्यांच्या जीवनात आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करत आहे.

 अरुणिमा सिन्हा

चोरांनी चालत्या ट्रेनमधून फेकल्यामुळे अरूणिमाला एक पाय गमवावा लागला. दोन वर्षांनंतर, अपंग असूनही माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी ती पहिली महिला ठरली. तिला स्वत:वर दया दाखवणारे लोक आवडत नाहीत. लोक त्याच्याकडे दयेने बघून तिला अपंग म्हणायचे तेव्हा तिला ते खटकायचे.

पण प्रबळ इच्छाशक्ती असते आणि एखादी गोष्ट करण्याची क्षमता असते, तेव्हा ते आपल्या शरीरापेक्षाही महत्त्वाचे असते. हे तिने सिद्ध केले. कृत्रिम पाय असूनही तिने सर्व आव्हानांना तोंड देत एक इतिहास रचला.

साधना धाड

हाडांच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या ५७ वर्षीय साधना धाड यांची वयाच्या १२व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गेली होती. पण असे असूनही आज त्या चित्रकलेच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

याशिवाय साधना यांना चित्रकला आणि छायाचित्रणासाठी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. आता त्या घरी विद्यार्थ्यांना फोटोग्राफी आणि पेंटिंगचे प्रशिक्षण देतात. या सर्वांव्यतिरिक्त, त्या एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत ज्या अपंग मुलांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या संस्थांसोबत काम करतात.  

मालती कृष्णमूर्ती

ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरा अॅथलीट होती. मालतीला लहान वयातच अर्धांगवायूचा झटका आला होता. दोन वर्षे सतत शॉकची ट्रिटमेंट दिल्यानंतर तिच्या शरीराच्या वरच्या भागाला काहीसे जीवदान मिळाले. पण तिच्या शरीराचा खालचा भाग तसाच राहिला.

अशा परिस्थितीतही तिने खेळात भाग घेणे थांबवले नाही. आणि आज तिने पॅरा ऑलिम्पिकमध्येही भाग घेऊन 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. तिने आतापर्यंत सुमारे 300 पदके जिंकली आहेत.

या सर्वांशिवाय त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या अपंग मुलांना मदत करण्यासाठी काम करते.

दीपा मलिक

 दीपा मलिक ही भारतातील पहिली अपंग महिला आहे जिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये दीपाने शॉटपुट गेममध्ये रौप्य पदक जिंकून देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांना 2012 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

याशिवाय, आज त्या भारत सरकारच्या 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या टीमची सदस्य आहे. यामध्ये ती क्रीडा आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात काम करतात. क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नियोजन आयोगाने यासाठी त्यांची निवड केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT