disadvantages of late marriage sakal
लाइफस्टाइल

उशीरा लग्न करणं पडेल महागात; मुलींनो, वेळीच सावध व्हा!

वाढत्या वयात लग्न झाल्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सकाळ डिजिटल टीम

भारतातील मुलींच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर पूर्वीच्या काळी मुलींची लग्ने अगदी लहान वयात होत असत पण आता तसे राहिले नाही. आजच्या आधूनिक काळात मुलींनाही शिक्षण, नोकरी आणि करिअरमुळे उशिरा लग्न करायला आवडते. अनेक वेळा वाढत्या वयात लग्न झाल्यामुळे महिलांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच समस्यांबद्दल सांगणार आहोत. (disadvantages of late marriage check list here)

1. जोडीदाराशी जुळवून घेणे कठीण

तरुण वयात महिलांचे लग्न झाल्याचा एक फायदा म्हणजे त्या तरुण असताना जोडीदाराशी जुळवून घेणे सोपे जात पण जेव्हा तुम्ही दीर्घकाळ अविवाहित आणि स्वतंत्र राहता तेव्हा मोठ्या वयात लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आवडी-निवडी आणि गरजांशी ताळमेळ राखणे काहीसे अवघड होऊन बसते यामुळे अनेकदा नातेसंबंधात दुरावा येतो.

2. गोष्टी एक्सप्लोर केल्यासारखे वाटत नाही

तरुण वयात स्त्री अॅक्टीव असते.तरुण वयातच अनेक छंद असतात. जसजसे वय वाढत जाते तसतसा उत्साह कमी होत जातो. त्यामुळे अनेक गोष्टी एक्सप्लोर करता येत नाही.

3. गरोदर राहण्यात अडचण

वयानुसार महिलांची प्रजनन क्षमता कमी होते. एका संशोधनात असे म्हटले आहे की वाढत्या वयामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही मूल होण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय वाढत्या वयानुसार महिलांना गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागतो आणि गर्भपात आणि प्रसूतीमध्ये अडचणी येतात. वृद्ध पालकांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना डाउन सिंड्रोम (मानसिक आणि शारीरिक विकार आणि इतर शारीरिक समस्यांचा धोका जास्त असतो.

4. जोडीदार निवडण्यासाठी कमी पर्याय आहेत

महिला असो की पुरुष, वाढत्या वयाबरोबर जोडीदार निवडण्याचे पर्यायही कमी होत जातात. वेळेवर लग्न न केल्यामुळे, अनेक वेळा मुली घरच्यांच्या दबावामुळे विचार न करता लग्न करतात, ज्यामुळे नंतर त्यांना पतीसोबत जुळवून घेण्यात खूप अडचणी येतात. कारण बऱ्याच बाबींमध्ये परस्पर सहमती होऊ शकत नाही आणि दोघांची विचारसरणी कोणत्याही गोष्टीबद्दल भिन्न असू शकते,ज्यामुळे दुरावा सुरू होतो.

5. शारीरिक जवळीक नसणे

उशिरा लग्न केल्याने जोडप्यांच्या लैंगिक जीवनावरही वाईट परिणाम होतो. तरुण जोडप्यामध्ये खूप उत्साह असतो आणि वय कमी असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर मुलाबाबत कोणताही दबाव येत नाही पण जे उशीरा लग्न करतात, त्यांच्यावर मुलं होण्यासाठी दबाव टाकला जातो, ज्यामुळे ते त्यांच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT