Diwali 2023 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सर्वत्र दिवाळीची लगबग पहायला मिळत आहे. ९ नोव्हेंबरला वसूबारसपासून दिवाळीची सुरूवात होणार आहे. दिवाळीचा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो.
दिवाळीच्या आधी सर्व जण घरांची स्वच्छता करतात आणि घराची सजावट करतात. जर तुम्हाला तुमचे घर दिवाळीला सुंदर सजवायचे असेल तर हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत वाचा. दिवाळीत घर सजवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
दिव्यांशिवाय दिवाळीच्या सणाची कल्पना करणे देखील व्यर्थ आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण होयं. दिवाळीमध्ये दिव्यांना फार महत्व आहे. त्यामुळे, घर सजवण्यासाठी दिव्यांचा आकर्षक पद्धतीने वापर करता येऊ शकतो.
तुम्ही कलरफूल दिव्यांचा देखील वापर नक्कीच करू शकता. बाजारामध्ये अशा प्रकारचे दिवे सहज मिळतात.
दिवाळीमध्ये दिव्यांनंतर अधिक महत्वपूर्ण असलेली रांगोळी सर्वांच्या आवडीची आहे. रांगोळीमुळे आपल्या घराच्या अंगणाला शोभा येते. त्यामुळे, खास दिवाळीमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या, डिझाईन्सच्या, पानाफुलांच्या रांगोळ्या काढू शकता.
रंगांचा वापर करून रांगोळ्या तर काढल्या जाताताच. परंतु, यासोबतच विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून ही तुम्ही रांगोळ्या काढू शकता. यामुळे, तुमच्या घराच्या सजावटीमध्ये आणखी भर पडेल यात काही शंका नाही.
दिवाळीमध्ये दिव्यांसोबतच आपण विविध प्रकारच्या लाईट्सचा ही वापर करतो. लाईटिंगच्या सजावटीमुळे घराला मस्त लूक येतो. मार्केटमध्ये आजकाल लाईटिंगचे अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत.
बाल्कनीमध्ये देखील लाईटिंगचा वापर केला जाऊ शकतो. या लाईटिंगच्या माळांमुळे घराचा लूकच बदलून जाईल. त्यामुळे, घराच्या सजावटीसाठी लाईटिंगचा नक्की वापर करा. रात्रीची ही लाईटिंग खूप छान दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.