fashion sakal
लाइफस्टाइल

Diwali 2023: दिवाळीत साडीला एक मॉडर्न लूक देण्यासाठी ट्राय करा फ्रिल वर्क ब्लाऊज, दिसाल सुंदर

मुली नेहमीच त्यांच्या वॉर्डरोबमध्ये सर्व प्रकारचे स्टायलिश कलेक्शन ठेवतात.

Aishwarya Musale

मुलींना फॅशनच्या बाबतीत नेहमीच अव्वल राहायचे असते, त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आउटफिट कलेक्शन असतात. आजकाल सगळ्यांनाच ट्रेंड फॉलो करायला आवडतो. फॅशन आणि स्टाइल वाढवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत आहेत. मुली नेहमीच त्यांच्या वॉर्डरोबमध्ये सर्व प्रकारचे स्टायलिश कलेक्शन ठेवतात. 

आजकालच्या महिलांना फॅशन ट्रेंड चांगलाच समजतो. त्यांना न्यु ट्रेंडची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे कोणत्या कार्यक्रमात कोणती स्टाइल करायची हे फॅशन ट्रेंड काय आहे हे पाहून ठरवले जाते. दिवाळीत साडी कॉमन असली तरी फ्रिल वर्कचा ट्रेंड आला आहे.

आधी फ्रिलची साडी बाजारात आली आणि मग त्यावर फ्रीलचे ब्लाऊज घालण्याची स्टाइल आली. काठपदर असो वा पार्टीवेअर साडी अशा कोणत्याही साडीवर मॅच होईल असेच याचे डिझाईन आहे.

आज काही वेगळे ब्लाउज डिझाईन्स पाहुयात. या डिझाईन्सने तूमचे ब्लाऊज आणि तूम्ही दोघेही खुलून दिसाल.जर तुम्हाला काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर तुम्ही ही डिझाइन करू शकता. अशा ब्लाउजला तुम्ही इंडो-वेस्टर्न लुकमध्ये स्टाइल करू शकता.

जर तुम्हाला स्लीव्हज आणि नेक लाईनची रेग्युलर स्टाइल नको असेल तर त्याजागी तूम्ही फ्रिल्स वापरू शकता. तसेच, ब्लाउजच्या खाली नेटची लेस वापरता येईल. सध्या साडीमध्ये नेटची साडी तरूणींच्या पसंतीस उतरते आहे.

त्यावर अशाप्रकारचे नेटचेच फ्रिल वर्कचे ब्लाउज तूम्हाला क्लासी लुक देईल. तूम्हाला शोल्डरला फ्रील वर्क नको असेल तर तूमच्यासाठी हे डिझाईन परफेक्ट आहे. लेअर असलेले फ्रील डार्क कलर ब्लाउजला अजून स्टायलीश बनवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT