Diwali Bhaubeej sakal
लाइफस्टाइल

Diwali Bhaubeej 2023 :भावाला औक्षण, टिळा लावताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Aishwarya Musale

दिवाळीचा पाच दिवसांचा सण भाऊबीज झाली की संपतो. हिंदू धर्मातील रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते, भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात.

भाऊबीज हा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा सण. या दिवाशी बहिण आपल्या भावाच्या दिर्घायुसाठी औक्षण करते. आपल्या संस्कृतीमध्ये कोणतेही सण धार्मिक विधीशिवाय पूर्ण होत नाहीत. भाऊबीजेला बहिणीने भावाला कशा रितीने औक्षण करावे व त्यासाठी काय तयारी करावी ते जाणून घेऊया.

भाऊबीजेला बहिणीने भावाचेऔक्षण करण्यासाठी पुजेचे ताट तयार करावे. त्यात कुंकू, हळद, अक्षता, नाण, सोनं, सुपारी, नारळ, दिवा, मिठाई ठेवावी.

भावाला औक्षणापुर्वी चौरंगावर किंवा पाटावर पुर्व पश्चिम बसवावे. या चौरंग किंवा पाटावर लाल आसन टाकावे त्यावर तांदळाची आरासही काढू शकता.

भावाला चौरंगावर बसवून बहिणीने सर्वप्रथम भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावावा. माथी कुंकवाचा टिळा लावणं हे दिर्घायु सोबतच प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.

कपाळी टिळा लावल्यानंतर डोक्यावर अक्षता टाकाव्या.

अक्षता म्हणजे औक्षवंत! दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अखंड आहेत अशा अक्षता पुजेच्या ताटात असाव्या. केलेलं पूजन देखील अक्षतांप्रमाणे पूर्ण असावे हा त्यामागील अर्थ आहे.

यानंतर भावाला सुपारी, सोन्याच्या एखादा दागिन्याने ओवाळावे. यासह ताटातील दिव्याने भावाची आरती ओवाळून औक्षण पुर्ण करावे. औक्षण पुर्ण केल्यानंतर भावाला गोड मिठाई खाऊ घालावी.

भाऊबीजेला भावाला औक्षण करून टिळा लावताना दिशेची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार टिळा लावतेवेळी भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे. त्याचबरोबर बहिणीचे तोंड ईशान्य किंवा पूर्व दिशेला असणे शुभ असते.

भावांनी लक्षात ठेवा!

औक्षणानंतर भावांनी बहिणींना भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांचे नेहमी रक्षण करण्याचे वचन द्यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

By-Elections 2024: 15 राज्यांमधील 48 विधानसभा आणि 2 संसदीय मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

Manoj Jarange: “आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचं फडणवीसांना थेट आव्हान

Election Commission Press Conference : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला! एका क्लिकवर वाचा सर्व अपडेट

SCROLL FOR NEXT