दिवाळीचा पाच दिवसांचा सण भाऊबीज झाली की संपतो. हिंदू धर्मातील रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते, भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो.
आपल्या संस्कृतीमध्ये कोणतेही सण धार्मिक विधीशिवाय पूर्ण होत नाहीत. भाऊबीजेला बहिणीने भावाला कशा रितीने औक्षण करावे व त्यासाठी काय तयारी करावी ते जाणून घेऊया.
भाऊबीजेला बहिणीने भावाचेऔक्षण करण्यासाठी पुजेचे ताट तयार करावे. त्यात कुंकू, हळद, अक्षता, नाण, सोनं, सुपारी, नारळ, दिवा, मिठाई ठेवावी.
भावाला औक्षणापुर्वी चौरंगावर किंवा पाटावर पुर्व पश्चिम बसवावे. या चौरंग किंवा पाटावर लाल आसन टाकावे त्यावर तांदळाची आरासही काढू शकता.
भावाला चौरंगावर बसवून बहिणीने सर्वप्रथम भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावावा.
कपाळी टिळा लावल्यानंतर डोक्यावर अक्षता टाकाव्या.
अक्षता म्हणजे औक्षवंत! दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अखंड आहेत अशा अक्षता पुजेच्या ताटात असाव्या. केलेलं पूजन देखील अक्षतांप्रमाणे पूर्ण असावे हा त्यामागील अर्थ आहे.
यानंतर भावाला सुपारी, सोन्याच्या एखादा दागिन्याने ओवाळावे. यासह ताटातील दिव्याने भावाची आरती ओवाळून औक्षण पुर्ण करावे. औक्षण पुर्ण केल्यानंतर भावाला गोड मिठाई खाऊ घालावी.
भावांनी लक्षात ठेवा!
औक्षणानंतर भावांनी बहिणींना भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांचे नेहमी रक्षण करण्याचे वचन द्यावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.