Diwali 2023  esakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : अंबाबाई मंदिराच्या शिखरावर आज प्रज्वलित झालेला काकडा म्हणजे नक्की काय?

या पंधरा दिवसात पहाटे २ वाजताच उघडतं देवीचं मंदिर

Pooja Karande-Kadam

Diwali 2023 : आज जगभरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. आजच्या या दिवशी अनेक प्रथा पार पाडल्या जातात. त्यापैकीच एक प्रथा म्हणजे महालक्ष्मी मंदिरावर आज काकडा प्रज्वलित केला जातो. काकडा म्हणजे नक्की काय हे पाहुयात.  

श्री अंबाबाई मंदिरातील काकडा प्रज्वलित करण्याच्या विधीला आज पहाटेपासून प्रारंभ झाला. तुपात भिजवलेली पेटती मोठी ज्योत (काकडा) मंदिराच्या शिखराच्या टोकावर ठेवण्याचा हा विधी असून हा पेटता काकडा हातात घेऊन मंदिराच्या शिखरावर चढवला जातो.

नरक चतुर्दशी पासून आईसाहेबांच कार्तिक स्नान सुरु होतं. अंबाबाईच्या देवळात एका भांड्यात भक्तांनी आणलेल्या वाती तूप यांच्या बरोबरच सुताची जाड वात केलेला काकडा तयार केला जातो. त्याची गंध फूल घालून पूजा केली जाते. रोषणनाईक ( दिवटीवाला) आणि काही ठराविक तरूण भक्त हा काकडा घेऊन शिखरावर चढतात, अशी माहिती इतिहास संशोधक ऍड. प्रसन्न मालेकर यांनी दिली.

रोषणनाईक दिवटीने काकडा पेटवतात. १७व्या शतकात बांधलेल्या या शिखराच्या टप्प्यांचा पायरी सारखा उपयोग करत तोल सावरण सोपं जावं म्हणून पाठमोरं चढत हा काकडा कळसावर आमलका शेजारी ठेवला जातो. खाली येऊन सनईच्या सुरावटीनं भारलेल्या वातावरणात आवारातल्या सर्व देवतांसमोर कापूर लावला जातो. ही प्रदक्षिणा पूर्ण होते तोच पुजारी अंबाबाईचा गाभारा उघडतात.

देवीची पाद्यपुजा होऊन काकडारती होते.  पुन्हा ही आरती महाकाली वगैरे पंचायतन देवतांना जाते.कापुरारती होऊन हा सोहळा संपन्न होतो. या पंधरा दिवसांत देवीच्या नित्योपचारात काही बदल होतात.

हा काकडा नरक चतुर्दशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालतो. नरक चतुर्दशी व त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देऊळ रात्री २ ला उघडते तर उर्वरित दिवशी पहाटे ३:३० ला उघडते

या पंधरा दिवसांत देवीची सकाळी ९ :३० ला होणारी आरती सकाळी ६:००ला होते. त्यामुळे ८:३० ची महापूजा आधीच होते. एरव्ही आरतीच्या वेळी पुरुष मंडळी पितळी उंबऱ्याच्या बाहेर व महिला आत असतात या पंधरा दिवसांत हे उलट असतं. संध्याकाळी ८:०० ला होणारी आरती ७:४५ ला होते  हा बदल रथसप्तमी पर्यंत असतो

शुक्रवारी रात्री ९:३०ला होणारी पालखी या पंधरा दिवसांत ८:४५ तर पौर्णिमेनंतर रथ सप्तमी पर्यंत ९:१५ ला होते. रात्री १०:१० ला होणारी शेजारती ९:४० ला होते आणि १०:३० ला बंद होणारा गाभारा १०:०० ला बंद केला जातो.

या काकडा सोहळ्यामागची संकल्पना

कार्तिक महिन्यात दिपदानाला प्रचंड महत्त्व आहे. यावेळी आपण जमिनीवर दिवे लावतो पाण्यात दिवे सोडतो. दिवा तर मूर्तीमंत तेज . वायू तर सर्वत्र आहे ‌ मग राहता राहीलं आकाश त्याला दिवा कसा द्यायचा तर नगरातील सर्वात उंच भाग म्हणजे मंदिराचं शिखर ! त्यामुळे हा आकाशदिप या शिखरावर चढवला जातो. तर आणि एका समजूतीप्रमाणे महालय पक्षात श्राद्धाला आलेले पितर सूर्य वृश्चिकेला जाताच या दिव्याच्या उजेडात आपल्या लोकी परत जातात.

तर तंत्रातल्या मान्यतेनुसार तिन्ही अग्नी ( दक्षिणायन सुरू झाल्याने सूर्य अमावस्येमुळे चंद्र आणि हवामानामुळे जठराग्नी (शरीरातला अग्नी) मंद असतात अशावेळी प्रबल असलेल्या धूमावती म्हणजे अलक्ष्मीस्वरुपी महाविद्या देवीला निरोप देण्यासाठी व कमलालक्ष्मीच्या स्वागतासाठी अग्नीक्रिडा (फटाके उडवणे दिवे लावणे . तेल उटणे फराळ यातुन जठराग्नी चेतवणे) करावी असं मानलं जातं. त्यातूनच हा सोहळा साकारला असावा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT