Diwali 2023 :
अशा अनेक कंपन्या आहेत ज्या दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. वर्षभर लोक या बोनसची वाट पाहत असतात. मात्र, बोनस मिळताच त्यांना पंख फुटतात आणि ते अत्यावश्यक कामावर खर्च करतात. बोनसची रक्कम योग्य प्रकारे वापरली जाणे महत्त्वाचे आहे.
तसं पाहिलं तर दिवाळीत खर्चही अधिक असतो, त्यामुळे बोनसही आवश्यकता असतेच. पण, तरीही खर्चावर नियंत्रण ठेऊन तुम्ही मिळालेला बोनस सेव्हिंगमध्ये टाकू शकता. आज आम्ही तुम्हाला बोनस कोठे खर्च करणे चांगले आहे हे सांगणार आहोत.
तुम्ही कर्जमुक्त असाल तर दिवाळीचा बोनस आपत्कालीन निधीसाठी वापरा. आपत्कालीन निधी आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. हा निधी अशा प्रकारे तयार केला गेला पाहिजे की 6 ते 9 महिने वाईट परिस्थितीतही तुम्हाला कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. कोरोनाच्या कालावधीनंतर आपत्कालीन निधीचे महत्त्व अधिक वाढले आहे.
दिवाळी बोनसचा मोठा भाग चांगल्या परताव्यासाठी गुंतवला जाऊ शकतो. अल्प किंवा दीर्घकालीन लक्ष्यांसह गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असेल. उदाहरणार्थ, म्युच्युअल फंड, एसआयपी, पीपीएफ इत्यादी पर्याय आहेत. तुम्ही योग्य गणना आणि तज्ञांच्या मतावर आधारित शेअर्सवरही पैज लावू शकता. (Saving Tips)
दिवाळीनिमित्त मिळालेला बोनस कर्जाची परतफेड करताना वापरणे चांगले. तुमच्यावर कोणतेही कर्ज असले तरी ते हाताळण्याचा प्रयत्न करा. आजकाल बहुतेक लोक कर्ज किंवा क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेले असतात. अशा लोकांसाठी दिवाळी बोनस उपयुक्त ठरू शकतो.
कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड करण्यासाठी बोनस पुरेसा नसला तरीही,थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणाकडून वैयक्तिक कर्ज घेतले असेल तर ते दिवाळी बोनससह परत करा जेणेकरून तुम्हाला नंतर टेंन्शन राहणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.