Diwali 2024 Fashion Tips:  Sakal
लाइफस्टाइल

Diwali 2024 Fashion Tips: तुम्हालाही सणासुदीत परफेक्ट लूक हवायं? मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये 'या' 4 प्रकारच्या साड्या असल्याच पाहिजेत

Fashion Tips: तुम्हाला सणासुदीच्या काळात हटके आणि स्टायिश लूक हवा असेल तर तुमच्याकडे या प्रकारच्या साड्या असल्याच पाहिजेत.

पुजा बोनकिले

Diwali 2024 Fashion Tips: प्रत्येक सणासुदीला आणि लग्न समारंभात काळात प्रत्येक महिलांना सुंदर, स्टायलिश दिवासं असं वाटतं. यासाठी ट्रॅडिशनल कपडे घालणे हा एक उत्तम पर्याय आहे. पण साडी निवडताना आणि स्टाइल करणे प्रत्येकासाठी सोपे नाही. आजकाल बाजारात अनेक डिझाइन असलेल्या साड्या मिळतात. पण तुमच्याकडे पुडील चार प्रकारच्या साड्या असल्या पाहिजे. ज्या तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात परिधान करू शकता आणि स्टायलिश दिसू शकता.

रफल साडी

फॅशनच्या जगात सध्या रफल साड्या खुप प्रिय आहे. तुम्ही हा ट्रेंड फॉलो करू शकता. रफल साडीमुळे तुम्हाल स्टायलिश लूक मिळतो. तसेच इतरांपेक्षा वेगळे दिसाल. तुम्ही हेअर स्टाइल किंवा ककेस मोकळे ठेऊ शकता. तुम्ही डायमंड ज्वेलरी किंवा मात्याचे दागिने परिधान करू शकता. यामुळे तुमचा लूक पुर्ण होईल. तसेच लाईट मेकअर करू शकता.

फोरल वर्क साडी

अनेक कार्यक्रमांमध्ये फोरल साडी घालून स्टायलिश लूक कॅरी करू शकता. तुम्ही यावर न्युड मेकअप करून लूक पूर्ण करू शकता. तुम्ही केसांची सुंदर हेअर स्टाइल करू शकता किंवा केस मोकळे ठेऊ शकता. जर तुम्हाला कॅज्युल लूक हवा असेल तर तुमचे केस मोकळे ठेऊ शकता किंवा पिन लावू शकता. तसेच फॉर्मल लूक हवा असेल तर केस सरळ करू शकता. सरळ केस सौंदर्यात अधिक भर पाडेल.

बनारसी साडी

बनारसी साड्या अनेकांना खुप प्रिय आहे. कोणत्याही कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात बनारसी साडी परिधान करू शकता. यामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. बनारसी साड्यांवर टेंपल ज्वेलरी अधिक सुंदर दिसते. तुम्ही केसांचा बन बनवू शकता. यंदा सणसुदीत वेगळा लूक करायचा असेल तर बनारसी साडी परिधान करू शकता.

एम्ब्रॉयडरी साडी

तुम्ही सणासुदीच्या काळात आणि समारंभात एम्ब्रॉयडरी साडी परिधान करू शकता. साड्यावरचे सुंदर वर्क तुम्हाला रॉल लूक देतात. जर तुम्हाला हलकी आणि ट्रेंडी साडी हवी असेल तर जॉर्जेट किंवा शिफॉन एम्ब्रॉयडरी केलेली साडी परिधान करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT