दिवाळी हा केवळ सण नाही तर सेलिब्रेशन आहे. फक्त कुटुंब नाही तर स्वतःबाबतही. या सणामध्ये क्वालिटी टाइम घालवताना एथनिक कलेक्शनची जोड सणाचा आनंद द्विगुणित करते. दिवाळीसाठी सुंदर आणि नवीन कपडे घेताना ट्रेंडी आणि स्टायलिश कलेक्शनचे लुकबुक बघितले तर असंख्य स्टाइल बघायला मिळतात.
दिवाळीसाठी नवीन कपड्यांचा आग्रह का, असा प्रश्न पडतो; पण लक्षात घ्या की दिवाळी म्हणजे नवीन सुरवात. म्हणूनच नवीन कपडे हीसुद्धा नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरते. असे म्हणतात, की दिवाळीत नवीन कपडे परिधान केल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते. सणांचे आध्यात्मिक नाते आहे. बघा ना, प्रार्थना करताना नेहमी स्वच्छ कपडे घालतो.
नवीन कपड्यांनी शरीराला आणि मनाला नवीन ऊर्जा मिळते. संस्कृती आणि परंपरांचा आदर करताना दिवाळीसारख्या मोठ्या सणासाठी नवीन कपडे घालणे एकप्रकारे परंपरांचा आदर दाखवण्याचा मार्ग आहे.
दिवाळी म्हणताच सर्वप्रथम नेसावी वाटते ती साडी. चिकनकारी साडी ही हौस पूर्ण करते. चिकनकारीच्या साड्या दिवाळीसाठी एकदम परफेक्ट ठरतात. चिकनकारी साड्या कॉटन आणि शिफॉन अशा दोन्ही प्रकारात मिळतात. यामध्ये तुम्हाला टिकली वर्क किंवा काही हेवी वर्क असा पर्यायही मिळतो. या साड्या फुलू नयेत अशा वाटत असेल, तर फिशकट परकरचा वापर योग्य राहील.
इंडिगो चिकनकारी साडी
इंडिगो रंग हा कधीच आऊट ऑफ फॅशन जात नाही. हा रंग नेहमीच उठून दिसतो. संपूर्ण चिकनकारी साडी नको असेल, तर तुम्ही काही पॅचवर्क केलेल्या साड्या निवडू शकता. इंडिगो रंग आणि पांढरा किंवा चिकनकारीचा कोणताही रंग छान दिसतो. कोणतीही शेड घेऊन ही साडी मस्त वेअर करा. ही साडी कितीही तास खराब होत नाही. त्यावर सुंदर ज्वेलरी परिधान केल्यास तुमचा लूक नक्की उठून दिसेल.
कलमकारी चिकन साडी दिसायला फारच सुंदर दिसते. ज्याप्रमाणे इंडिगो रंगाचा पॅच लावून ज्या पद्धतीने चिकनकारी साड्या मिळतात, अगदी तसाच प्रकार तुम्हाला कलमकारी चिकन साड्यांमध्ये मिळेल. कलमकारी बॉर्डर लावलेल्या साड्याही यामध्ये फार सुंदर दिसतात. ज्या तुम्ही कधीही आणि केव्हाही नेसू शकता. कलमकारी चिकन साड्या रेडिमेड मिळाल्या नाहीत, तर त्या तुम्ही तयारही करुन घेऊ शकता. कलमकारीचा कपडा आणून तुम्ही निवडलेल्या चिकनकारी कपड्याला काठ लावू शकता. अशी साडी तुम्ही कस्टमाईज करुन घेऊ शकता. सणाला डिझायनर साड्या बाजूला ठेवून अशा साड्या नक्की वापरून पाहा. जरा बदल म्हणून ऑफ-शोल्डर ब्लाउज घालता येईल. याशिवाय हँड ब्लॉक प्रिंटेड साड्याही घेऊ शकता.
दिवाळीसाठी रॉयल लूक हवा असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या स्टाइलमध्ये ऑर्गेन्झा चिकनकारी व्हाइट लाँग कुर्ते घेऊ शकता. यामध्ये अंगरखा स्टाईल कुर्ता सध्या खूप ट्रेंडी आहे. शाही लुकमुळे हे कुर्ते खूप ट्रेंडमध्ये आहेत. ऑक्सिडाइज्ड कानातले किंवा चोकर्स तुच्या ऑर्गन्झा कुर्त्याला शोभून दिसतात. सोबत मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल अशी पारंपरिक पादत्राणे हवी. दिवाळीमध्ये एकदा तरी सिल्क कुर्ता घालायला हरकत नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी हा कुर्ता छान दिसतो. सिल्क कुर्त्यावर सोन्याचे किंवा मोत्यांची दागिने खूप उठून दिसतात.
इंडो-वेस्टर्न लूक मिळवण्यासाठी शॉर्ट कुर्त्यांचा पर्याय आहे. यासाठी निळ्या, पिवळ्या, गुलाबी किंवा जांभळ्या रंग निवडता येतो. सोबत पलाझो किंवा धोती स्टाइल पॅंट किंवा सेमी पटियाला हा फ्युजन आऊटफिट कोणत्याही दिवाळी पार्टीसाठी अप्रतिम दिसेल. यावर ऑक्सिडाइज्ड कानातले, स्टेटमेंट नेकलेस आणि नोज रिंग शोभून दिसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.