Diwali Recipe 2023 esakal
लाइफस्टाइल

Diwali Recipe 2023 : फराळातील सर्वात पौष्टीक पदार्थ आहे कडबोळी; रेसिपी नोट करून ठेवा

कडबोळी आपल्या फराळातून नामषेश झाली आहे

Pooja Karande-Kadam

Diwali Kadboli Recipe 2023 :

दिवाळीच्या फराळातील सर्वात पौष्टीक पदार्थ कोणता असे विचारले तर सांगता येणार नाही. कारण, सगळेच पदार्थ तेलकट, मसालेदार असतात. चव चाखायला म्हणून ठिक आहे. पण आरोग्यासाठी तसा त्याचा फायदा नाहीच. पण आपल्या फराळातून नामशेष होत असलेला एक पदार्थ आरोग्यासाठी लाखमोलाचा आहे.

कडबोळी हा पारंपरिक पदार्थ आहे. ते अनेक धान्यांपासून बनवले जाते. एकावेळी अनेक पदार्थ पोटात जातात जे हिवाळा, पावसाळ्यातील वातावरणात आपल्याला पौष्टिक पदार्थ खावे लागतात. त्यावेळी हा पदार्थ तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करतो.

त्याची चव थोडी चटपटीत असते. अन् तो हातावर वळून तयार करावा लागतो. चकलीसारखीच चव असलेली कडबोळी अनेकांची फेव्हरेट आहे.  ही कशी बनवायची अन् त्यासाठी काय साहीत्य लागेल हे पाहुयात.

साहित्य :

थालीपीठ भाजणी २ फुलपात्री भरून, २ टे. स्पून तीळ, २ चहाचे चमचे तिखट, २ चहाचे चमचे मीठ, १ टी स्पून ओवा, ४ टे. स्पून कडकडीत तेल, तळण्याकरता तेल.

अशी बनते कडबोळी

एका पातेल्यात २ फलपात्री भरून थालीपीठ भाजणी घ्यावी. त्यात तीळ, ओवा, तिखट, मीठ घालावे व ४ टे. स्पून घालावे. सर्व नीट मिसळावे व १ फुलपात्र भरून पाणी उकळून भाजणीवर घालावे व मिसळून झाकून ठेवावे.

एका तासाने भाजणी हाताने पाणी लावून खूप मळावी. थोडीशी भाजणी घेऊन पोळपाटावर बोटाने वातीसारखी लांब वळावी. साधारण २ इंचाएवढी लांब नळी झाली की नळीची दोन्ही टोकं एकत्र दाबून कडबोळं तयार करावे.

पसरट कढईत तेल तापवून आच मंद करावी व वरीलप्रमाणे तयार केलेली १० ते १२ कडबोळी घालून मंद आचेवर काळपट रंगावर खमंग तळावीत. मऊ किंवा कच्ची ठेवू नयेत. वरील साहित्यात अंदाजे अर्धा किलो कडबोळी होतात.

महत्त्वाची गोष्ट -

कडबोळ्याच्या भाजणीत नेहमी उडदाच्या डाळीपेक्षा संपूर्ण काळे उडीदच वापरावेत. त्यामुळे भाजणी खमंग होते व कडबोळ्यांना रंग पण चांगला येतो.

कडबोळ्यांची भाजणी जुनी असेल तर करताना १ चमचा धन्याची पावडर घालावी.

(संबंधित माहिती जयश्री देशपांडे यांच्या ‘हमखास पाकसिद्धी’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT