पाऊस जास्त पडू लागला की हवाहवासा वाटणारा पाऊस महिलांना नकोसा वाटयला लागतो. कारण की, महिलांना घरातील सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. घरातील साफसफाई पासुन घरातील लोकांच्या कपड्यापर्यंत तिला सगळ्या गोष्टी टापटीप ठेवाव्या लागतात.एखादा महिलेच्या दुष्टीने पावसाळ्यातील सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पावसाळ्यात ओले कपडे न वाळणे आणि त्यानंतर त्या कपड्यांना कुबट वास सुटणे. अशावेळी काय करावे, असा प्रश्न प्रत्येक बाईला पडतो. पण, मैत्रिणीनो आता चिंता सोडा आज आपण यावर काही उपाय पाहणार आहोत. यामुळे महिला वर्गाची समस्या दूर होण्यास मदत होईल.
सर्वप्रथम समजून घेऊ या कपड्यांना दुर्गंधी का येते?
● पावसात भिजून आल्यानंतर आपले कपडे ओले असतात. ते कपडे आपण तसेच गोळा करुन ठेवले तर त्या कपड्यांना दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ओले कपडे तसेच गोळा करुन ठेवणे टाळा.
● बाहेर पाऊस पडत असल्यामुळे कपडे घरात सावलीत सुकत घातले जातात. त्यामुळे ते लवकर सुकत नाहीत. ते तसेच ओलसर राहतात आणि कपड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात आणि कपड्यांना कुबट वास येण्यास सुरुवात होते. आणि हा वास काही केल्या जात नाही. त्यामुळे कपडे लवकरात लवकर सुकविण्याचा प्रयत्न करा.
● अनेक जणांना धुण्याचे कपडे हे मशीनमध्ये ठेवण्याची सवय असते. ही सवय सोडून द्या. तसेच पावसात भिजलेले कपडे मशीनमध्ये किंवा बादलीत तसेच साठवून ठेऊ नका. यामुळे कपड्यांना कुबट वास येतो.
● डिटर्जंटशिवाय कपडे धुवू नका.
● सावलीत किंवा बंद खोलीत कपडे सुकत घालू नका.
● ओले कपडे रात्रभर डिटर्जंटमध्ये घालून ठेऊ नका.
● कपडे पूर्ण कोरडे झाल्याशिवाय ते कपाटात ठेवण्याची चूक करु नका.
आता बघू या कुबट वास येऊ नये म्हणून काय करावे ?
कपडे सुखवण्यासाठी पंख्याचा वापर करा. कपडे सुकण्यासाठी पंख्याचा वापर करु शकता. पंख्याखाली कपडे सुकण्यास ठेवा. याकरता हँगरचा वापर करा. यामुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होते. तसेच एकाद्या मोकळ्या खोलीत कपडे सुकत घाला. त्याठिकाणी सुगंधित अगरबत्ती लावा. यामुळे कपड्यांचा कुबट वास जाण्यासाठी मदत होईल.
कपडे धुण्यासाठी घरगुती कोणत्या गोष्टी वापरता येतील ?
लिंबाच्या रस: कपडे धुण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करणे योग्य ठरेल. लिंबू हे एक नैसर्गिक आम्लयुक्त आहे. यामुळे कपड्यांची दुर्गंधी जाण्यासाठी मदत होते. कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
व्हिनेगर: खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या व्हिनेगरचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी व्हिनेगर चांगले कार्य करते. यामुळे कपड्यांचा कुबट वास दूर होण्यास मदत होते. कपडे धुताना व्हिनेगर वापरावे. यामुळे कपड्यांचा कुबट वास दूर होतो.
बेकिंग सोडा: जेवणात वापरला जाणारा खाण्याचा सोडा देखील यावर एक रामबाण उपाय आहे. खाण्याचा सोडा दुर्गंधी घालवण्यास मदत करतो. याकरता एक बादली पाण्यात १ चमचा खाण्याचा सोडा टाकावा आणि त्यात कपडे भिजत घालावे यामुळे कपड्यांचा कुबट वास जाण्यास मदत होते.
सुगंधित डिटर्जंट: कपडे धुताना सुगंधित डिटर्जंटचा वापर करा. यामुळे कपड्यांची दुर्गंधी जाऊन कपड्यांना छान सुगंध येतो. तसेच कपडे धुताना सुगंधित द्रव्याचा वापर करा. याचा चांगला फायदा होतो.
मिठ: तुमच्या वॉर्डरोबमध्ये एका कोपऱ्यात मिठानं भरलेली पिशवी ठेवावी. ही पिशवी केवळ ओलावाच शोषून घेत नाही तर कपडे देखील कोरडे ठेवण्यास मदत करते.
डांबर गोळ्या: कपाटात प्रत्येक खणात डांबर गोळ्यांचा वापर करा. यामुळे चांगला सुगंध येतो आणि कपड्यांना कुबट वास येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.