LPG-cylinders.jpg Esakal
लाइफस्टाइल

LPG सिलिंडरला Expiry Date असते का? सुरक्षेची अशी घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

LPG Cylinder Expiry Date Information: घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्यांना मनामध्ये कधी कधी त्याच्या सुरक्षेबाबात शंका निर्माण होत असतात. तुमच्या एलपीजी सिलिंडर की एक्सपायरी डेट असते का? तो किती सुरक्षित आहे हे कसे समजते? याबाबत ऑईल मार्केटिंग कंपनी आईओसीएल(इंडियन आईल) ने ग्राहकांना खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.

आईओसीएलच्या वेबसाईटवर जाहीर केली माहिती

आईओसीएलच्या वेबसाईटवर जाहीर केलेल्या माहितीनुसार, सर्व एलपीजी सिलेंडर)LPG Cylinder) एका विशेष प्रकारच्या स्टील आणि प्रोटेक्टिव कोटिंगसह तयार केले जातात आणि त्यांची मॅन्यफॅक्चुरिंग BIS 3196 नुसार होतो. चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्सद्वारे (CCOE) मान्यताप्राप्त आणि BIS परवाना असलेल्यांना सिलिंडर उत्पादकांनाच केवळ ते तयार करण्याची परवानगी आहे (Does LPG cylinder have Expiry Date What is test Due date What are safety measures)

एक्सपायपी डेटसंदर्भातील माहिती

आईओसीच्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे.हे सर्क्युलर सन २००७ चे आहे. एक्सपायरी डेट त्या वस्तूंची असते की ठराविक कालावधीमध्ये खराब होणार असतात. एलपीजी सिलिंडरबाबत सांगायचे झाले तर ते अनेक बाह्य आणि अंतर्गत मानकांनुसार तयार केले जातात त्यामुळे त्याची एक्सपायरी नसते. LPG सिलिंडरला केवळ वेळोवेळी चाचणी करण्यासाठी तारीख(Test Due Date) दिलेली असते.

एलपीजी सिलिंडरच्या या दोन चाचण्या करणे अनिवार्य

एलपीजी सिलिंडचे साधारणपणे १५ वर्षे वापरला जातो आणि त्या काळात दोनदा अनिवार्य चाचण्या घेतल्या जातात. हायड्रो चाचणी(Hydro test)द्वारे सिलेंडरची गळती तपासली जाते आणि न्यूमॅटिक्स चाचणीमध्ये सामान्यतः साठवलेल्या पेक्षा पाचपट जास्त दाब लागू केला जातो. यापैकी कोणत्याही एका चाचणीत सिलेंडर अयशस्वी ठरल्यास ते पुन्हा वापरले जात नाही. दररोज वापरात असलेल्या एकूण सिलिंडरपैकी 1.25% चाचण्यासाठी पाठवले जातात आणि त्यापैकी काही टक्के पुन्हा वापरले जात नाही.

सिलेंडरच्या मार्किंग किंवा कोड कसा पाहावा

एलपीजी सिलेंडरामध्ये स्टॅच्युरटी टेस्टिंग आणि पेंटिगसाठी वेळ निविडला जातो आणि त्यानुसार त्यावर एक कोडप्रमाणे, टेस्टिंगला पाठविण्यासाठी पुढची तारीख ((Test Due Date) लिहली जाते. उदाहरणार्थ A -22 म्हणजे, सन 2022च्या पहिले तिमाहीत (एप्रिल-जून) टेस्टिंगसाठी पाठवावे लागेल. अशाच प्रकारे B -22 सिलेंडर वर लिहले असेल तर सन 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत ( जुलै-सप्टेंबर) री-टेस्टिंगसाठी पाठविला पाहिजे. त्याच प्रमाणे C -22 चा अर्थ असतो की तिसऱ्या तिमाहीत(ऑक्टोबर-डिसेंबर) टेस्टिंग साठी पाठवावे लागेल. D -22 ज्या सिलेंडरवर लिहले असेल त्यांना सन -22 मध्ये चौथ्या तिमाहीमध्ये (जानेवारी-मार्च)दरम्यान री-टेस्टिंगसाठी पाठवावा लागेल.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटची लिंक महत्त्वाची

जर तुम्हाला याबाबत आणखी माहिती हवी असेल तर इंडियन ऑयलच्या वेबसाइटला भेट द्या आणि सविस्तर सुचना वाचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT