Dombivli History: Sakal
लाइफस्टाइल

Dombivli History: डोंबिवली हे नाव कसं पडलं? हजारो वर्षांच्या आख्यायिकेचा इतिहास

Dombivli History: येथे डोंब लोकांची वस्ती होती म्हणून याला डोंबिवली असे नाव पडले अशी आख्यायिका आहे.

पुजा बोनकिले

Dombivli History: स्वप्नांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डोंबिवली हे एक उपशहर आहे. ठाण्यापासून वीस किलोमिटर अंतरावर असणारे आणि कल्याणपासून सहा किलोमिटरवर असणार डोंबिवली हे शहर वसलेले आहे. याचा उल्लेख थेट पेशवेकाळात सापडतो. डोंबिवली...! नाव जरा हटके वाटते ना...! पण हे नाव कसे पडले असेल याचा कधी विचार केला आहे का? नाही ना..!चला तर मग जाणून घेऊया डोंबिवली हे नाव कसे पडले.

येथे डोंब लोकांची वस्ती होती म्हणून याला डोंबिवली असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. डोबिंवली शरहाराचा इतिहास उलगडून सांगणारे फार कमी पुरावे सध्या उपस्थित आहे.

आख्यायिकेनुसार शिलाहार राजा हरिपालदेव याचा १०७५ (सन ११५३) मधील माहूल शिलालेख आहे. यामध्ये दोन दानांचा उल्लेख आहे. पहिले दान माहवल गावासंदर्भात आहे तर दुसरे दान डोंबिल गावाशी संबंधित आहे. हिरिपालदेवाच्या राज्यराळात ब्राम्हण दोवर्धनभट्ट याला डोबिंल येथील वाटिका दान करण्यात आली.

या लेखात वर्णन करण्यात आलेले डोंबिल म्हणजेच डोंबिवली, असे अभ्यासकांचे मत आहे. अभ्यासकांच्या मते ८५० वर्षांचा इतिहास आहे. डोंबिवलीपासून खिडरकाळी गाव जवळ आहे. या गावामध्ये खिडकाळेश्वर मंदिर आहे. हे मंदिर शिलाहार-यादव काळातील आहे. या मंदिराच्या समोर तलाव आहे. डोंबिवली मानपाडा रोड गावदेवी मंदिराच्या इथे असलेला गद्धेगळ वर्षानुवर्षे शनिदेवाची पुजा केली जात होती. तेलाचा अभिषेक केला जात असल्याने शिलालेख अवाचनी झाले आहे.

गद्धेगळ म्हणजे काय आणि त्याच्यावर असलेल्या शिलालेखाची माहिती येथे लावलेली नसल्यामुळे आजही या रस्त्याने येणारे लोक गद्धेगळाला शनिदेव म्हणून नमस्कार करतात.

पण याच्यासंदर्भात डोंबिवलीतील एका गावदेवी मंदिराच्या परिसरात शिलाहार-यादवकालीन वीरगळाचे अवशेष बघायला मिळतात. वीरगळावर वार आणि त्याची पत्नी शिवलिंगाची पुजा करत आहेत असे शिल्प कोरले आहे.

सांस्कृति नगरी हे बिरूद मिरवणाऱ्या डोंबिवली शहरातील नागरिकांची पुरावशेषांप्रती असलेली अनास्था फार खेदकजनक आहे.

डोंबिवलीची संस्कृती

डोंबिवली विविध संस्कृतीने नटलेली आहे. येथे अनेक चर्च, मशिदी, मंदिरे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. शहरातील काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये गाव देवी मंदिर, गणपती मंदिर यांचा समावेश आहे. संगीत, नृत्य, नाटक इत्यादींमध्ये रस असणारे अनेक कलाकार या शहरातही आहेत.  येथील लोक प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात.

देश -विदेशातील अनेक पर्यंटक येथे भेट देण्यासाठी येतात. शहरात अनेक मंदिरे, चर्च, मशिदी इत्यादी आहेत ज्यांना राज्यभरातून भाविक भेट देतात.  तसेच येथे सुपरमार्केट डिपार्टमेंटल स्टोअर्स, जनरल स्टोअर्स, मार्केट, मॉल्स, बाजार इत्यादींनी डोंबिवलीतील रहिवाशांचे जीवन खूप सोपे केले आहे.

डोंबिवलीत खरेदी करणे खरोखरच मजेदार आहे आणि रस्त्यावरून चालत असताना उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टी पाहता येतात. तुम्ही शहरातच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फॅशन ॲक्सेसरीज, कपडे, संगीत वाद्ये मिळवण्यासाठी चालत जाऊ शकता. अनेक सुपरमार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्स, जनरल स्टोअर्स, मार्केट, मॉल्स, बाजार इत्यादींनी डोंबिवलीतील रहिवाशांचे जीवन खूप सोपे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT