Domestic Workers Welfare Scheme sakal
लाइफस्टाइल

घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना

घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना खास योजना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आणली आहे.

सकाळ वृत्तसेवा

घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना खास योजना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आणली आहे. यात घरगुती काम करणाऱ्या महिलांवर मुलांच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी असते. स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी असते.

त्या अत्यंत कमी पगारात इतरांच्या घरी धुणीभांडी, जेवण बनविणे, साफसफाई अशी घरकामे करतात. परंतु त्यांना तुटपुंजा पगारात स्वतःच्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करणे शक्य होत नाही. अशा महिलांसाठी राज्य सरकारच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

‘घरगुती कामगार कल्याण योजना’ असे या योजनेचे नाव आहे. घरकाम करणाऱ्या व्यक्तीचा विकास करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे. घरेलू कामगार योजनेअंतर्गत घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.

यात, अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे, अशा तरतुदी या योजनेअंतर्गत करण्यात आल्या आहेत.

योजनेचा उद्देश

  • घरकाम करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक; तसेच आर्थिक विकास करणे.

  • कामगारांचे जीवनमान सुधारणे.

  • कामगारांना विविध प्रकारचे सहाय्य करणे.

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT