dr babasaheb ambedkar and mamasaheb varale esakal
लाइफस्टाइल

Ambedkar Jayanti: खून खटल्याचे वकील म्हणून आले अन् मिरजकरांच्या हक्कांसाठीचा लढा जिंकला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगलीत आले ते एका खून खटल्यात वकील म्हणून. मात्र इतिहासात या भेटीची नोंद झाली ती वेगळ्याच कारणांसाठी.

जयसिंग कुंभार,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगलीत आले ते एका खून खटल्यात वकील म्हणून. मात्र इतिहासात या भेटीची नोंद झाली ती वेगळ्याच कारणांसाठी.

सांगली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगलीत आले ते एका खून खटल्यात वकील म्हणून. मात्र इतिहासात या भेटीची नोंद झाली ती वेगळ्याच कारणांसाठी. या भेटीत मिरजेतील समाजबांधवांनी तत्कालीन रेल्वेमार्गासाठी झालेल्या भूसंपादनाची भरपाई न मिळाल्याबद्दलचे गाऱ्हाणे मांडले. बाबासाहेबांनी सर्वांना ही भरपाई मिळावी यासाठी सत्याग्रहाचे, आंदोलनाचे आवाहन केले. आणि हा लढा यशस्वी झाला. या लढ्याचे नेतृत्व निपाणीचे आमदार मामासाहेब वराळे यांनी केले. त्यांनी या प्रश्‍नात लक्ष घालावे, असे आदेश डॉ. आंबेडकर यांनी दिले होते. या सर्व इतिहासाच्या काही पाऊलखुणांचा दस्ताऐवज मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे आहे. मात्र डॉ. आंबेडकर ज्या खून खटल्‍यासाठी सांगलीत आले त्याची कागदपत्रे मात्र उपलब्ध नसल्याने त्याचे तपशील इतिहासजमा झाले आहेत.

या इतिहासाचे संदर्भ अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. ते म्हणाले, ‘सध्या कर्नाटकात असलेले तेरदाळ त्यावेळी सांगली संस्थानचा भाग होते. त्यामुळे तेथील खून खटल्याची सुनावणी राजधानी म्हणून सांगलीत झाली. त्याच्या सुनावणीसाठी २० ते २१ नोव्हेंबर दरम्यान ते सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांचा मुक्काम मिशन कंपाउंडमध्ये होता. अर्थात हे ठिकाण मिरजेतीलच असावे. कारण त्या भेटीदरम्यान त्यांची भेट मिरजेतील दलित समाजातील लोकांनी घेतल्याचे उल्लेख मिरज संस्थानच्या कागदपत्रात आढळतात. दिवसभरात सांगलीतील कोर्टातील खटल्याचे काम आटोपून सायंकाळी डॉ. आंबेडकर मिरजेत वस्तीत गेले. तेथे नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.

दहा पंधरा मिनिटांचे भाषण त्यांनी केले. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर जमीन भरपाई विषयीचे गाऱ्हाणे मांडले. यात तेव्हाच्या बार्शी रेल्वे लाईनच्या कामासाठी महार वतनाच्या जमिनींचे भूसंपादन झाले होते. ब्रिटिश सरकारने भूसंपादनापोटीची भरपाई मिरज संस्थानकडे जमा केली होती. मात्र ती बाधितांच्या पदरात पडली नव्हती. बाबासाहेबांनी तेव्हाचे मिरजेचे अधिपती नारायणराव तात्यासाहेब पटवर्धन यांना भेटीची वेळ मागितली, मात्र त्यांना ती मिळाली नाही. त्यानंतर बाबसाहेबांनी समाजबांधवांना सत्याग्रह आंदोलनाचा सल्ला दिला.

त्यासाठी सर्वोतपरी पाठिंब्याचा शब्द दिला. या कामी त्यांनी त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे बेळगाव-धारवाडचे आमदार बळवंत हणमंतराव तथा मामासाहेब वराळे यांना सूचना केल्या. श्री. वराळे त्या दौऱ्यात त्यांच्यासोबत होतेच. पुढे महिना दोन महिन्यांतच श्री. वराळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थानकडे भरपाईसाठी पाठपुरावा सुरू झाला. डिसेंबर १९४१ मध्ये आंदोलन सुरू झाले. मिरजेच्या न्यायालयात खटलाही दाखल झाला. १९४२ मध्ये लोकांना काही प्रमाणात भरपाईचा आदेश झाला. यानिमित्ताने दुर्लक्षित समाजाला कायदेशीर मार्गाने लढण्याचा कानमंत्रच बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दिला.’

मामासाहेबांचा संघर्ष

बाबासाहेबांचे निष्ठावान अनुयायी म्हणून मामासाहेब वराळे यांनी ‘डॉ. आंबेडकरांचा सांगाती’ या ग्रंथातून बाबासाहेबांच्या १९२५ पासूनच्या मनाला चटका लावणाऱ्या अनेक आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांचे निधन ९ ऑगस्ट १९७८ रोजी मुंबईत राजगृहात बाबासाहेबांच्या निवासस्थानी निधन झाले. आयुष्यभरच नव्हे, तर बाबासाहेबांच्या पश्‍चातही त्यांनी आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी आणि सेवेसाठी त्यांनी समर्पण दिले. दीर्घकाळ ते बाबासाहेबांच्या औरंगाबादच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीवर अध्यक्ष व सदस्य होते. नागपूरच्या दीक्षाभूमीवरील धर्मांतर पर्वाचेही ते कृतीशील साक्षीदार होते. बाबासाहेबांसोबत ते काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेतही सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी मिरजेत राहून समाजबांधवांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.

डॉ. आंबेडकर यांनी मिरजेतील समाजबांधवांसाठी दिलेल्या लढ्याची कागदपत्रे आता उपलब्ध झाली आहेत. मात्र ज्या खून खटल्यासाठी ते सांगलीत आले त्याची माहिती मात्र उपलब्ध नाही. आठ वर्षांपूर्वी मी सांगली न्यायालयाच्या दप्तरात मोठी शोध मोहीम राबवली. मात्र अपयशच आले. हा खटला फौजदारी स्वरूपाचा होता. त्यावेळी वीस वर्षांपर्यंतच फौजदारी खटल्याची कागदपत्रे जपून ठेवली जायची. दिवाणी खटल्याची कागदपत्रे मात्र दीर्घकाळ आजही जपून ठेवली जातात.

- मानसिंगराव कुमठेकर, इतिहास संशोधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT