Research Sakal
लाइफस्टाइल

Research: विमान प्रवासादरम्यान अल्कोहोलचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक, संशोधनात समोर आली माहिती

पुजा बोनकिले

Health Care Tips: अनेक लोकांना विमानाने प्रवास करणे आवडते. विमानात जर विंडो सीट मिळाली तर आनंद अजून द्विगुणित होतो. अनेकदा लोकांना विमानाने प्रवास करताना मद्यपान करणे आवडते. जगभरातील अनेक एअरलाईन्स फ्लाइटमध्ये अल्कोहोलिक पेय देतात आणि लोक त्यांचा पुरेपूर आनंद घेतात. पण असे करणे लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अलिकडेच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, लांबच्या विमान प्रवासादरम्यान मद्यपान घेऊन झोपल्यास हृदयासंबंधित विकार होऊ शकतात.

मेडिकल जर्नल थोरॅक्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात समोर आले की विमान प्रवासादरम्यान मद्यपान केल्यास आरोग्यासाठी चांगले नसते. कारण विमानातील हवेचा दाब कमी होतो आणि अशा स्थितीत मद्यपान करून झोपल्याने लोकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. हायपोबॅरिक स्थितीत अल्कोहोल पिऊन झोपल्याने हृदयाच्या प्रणालीवर खूप दबाव पडतो. यामुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केवळ रुग्णच नाही तर निरोगी लोकांनीही असे केल्यास हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की , विमान प्रवासादरम्यान अतिमद्यपान केल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते. ज्या लोकांना आधीच हृदयासंबंधित आजार आहेत किंवा वृद्ध आहेत अशा लोकांना जास्त त्रास होतो. त्यामुळे अशा लोकांनीविमान प्रवासादरम्यान मद्यपान करणे टाळावे.यामुळे विमान प्रवासादरम्यान मर्यादित मद्यपान करावे.

संशोधकांनी १८ ते ४० वर्षे वयोगटातील४८ निरोगी लोकांचा यामध्ये समावेश केला होता. या लोकांना दोन गटात विभागले होते. पहिल्या गटातील लोकांना जमिनीवर बसून मद्यपान केले तर दुसऱ्या गटातील लोकांनी विमानात बसूण मद्यपान केले होते.

अभ्यासात असे दिसून आले की जे लोक झोपण्यापूर्वी विमानात मद्यपान करतात, त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन सॅच्युरेशन 85% च्या खाली गेली आणि त्यांच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट सरासरी 88 बीट्स पर्यंत वाढले. ज्या लोकांनी जमिनीवर मद्यपान केले त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन सॅच्युरेशन 95% पर्यंत वाढली आणि त्यांच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट 77 बीट्स पर्यंत वाढले. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, निरोगी लोकांमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन सामान्यतः 95% ते 100% दरम्यान असते. 90% पेक्षा कमी ऑक्सिजन सॅच्युरेशन हे चिंतेचे कारण असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT