water sakal
लाइफस्टाइल

Health Care News: गोड खाऊन लगेच पाणी पिण्याची चूक करताय? थांबा, वाचा याचे दुष्परिणाम…

Aishwarya Musale

आजच्या व्यस्त जीवनात स्वतःला निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा अनेक छोट्या-छोट्या चुका कळत-नकळत केल्या जातात, त्या आरोग्य बिघडवण्यासाठी पुरेशा असतात. अशाच एका आजाराचे नाव आहे मधुमेह.

पण त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रक्तातील साखरेची पातळी ओव्हरफ्लोमुळे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत, निरोगी जीवनशैली आणि चांगल्या खाण्याच्या सवयी सर्वात महत्वाचे आहे. तसेच गोड खाणे टाळावे.

गोड खाणे मधुमेहामध्ये हानिकारक असू शकते. गोड खाल्ल्यास लगेच पाणी पिण्याची चूक करू नका. गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास भाग पाडत आहात.

आता प्रश्न असा आहे की मिठाई खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे? आहारतज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया...

टाइप-2 मधुमेहाचा धोका जास्त असतो

आहारतज्ञ सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर सर्वप्रथम त्याने गोड खाणे टाळावे. यानंतरही कोणी गोड खात असेल तर लगेच पाणी पिणेही टाळावे. कारण ज्या लोकांना गोड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते त्यांना टाइप-2 मधुमेहाचा धोका झपाट्याने वाढतो. पाण्यासोबत ग्लुकोज शरीरात झपाट्याने शोषले जाते.

तज्ज्ञांच्या मते, गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. असे केल्यास शरीरात ग्लुकोज झपाट्याने शोषून घेणे सुरू होईल. त्यामुळे साखरेची पातळीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. अशा परिस्थितीत मिठाई खाल्ल्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी पाणी पिणे चांगले. शक्य असल्यास, आपण ही वेळ वाढवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT