Raisin Water sakal
लाइफस्टाइल

Raisin Water: दररोज प्या मनुक्याचे पाणी, शरीराला होतील 'हे' जबरदस्त फायदे!

हलवा आणि खीर इत्यादी अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये मनुका लोकप्रिय आहे.

Aishwarya Musale

मनुका अनेक प्रकारच्या पदार्थांसाठी वापरतात. हलवा आणि खीर इत्यादी अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये मनुका लोकप्रिय आहे. यामुळे जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचबरोबर अनेक पोषक घटकही असतात. उन्हाळ्यात मनुका पाणीही पिऊ शकता. मनुका पाणी आरोग्याला अनेक फायदे देण्याचे काम करते. हे एक आरोग्यदायी पेय आहे.

यासाठी रात्री सुमारे 10 मनुके पाण्यात भिजवावे. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्या. मनुका पाणी पिण्याचे आरोग्यास कोणते फायदे आहेत, चला जाणून घेऊया.

डिटॉक्सिफिकेशन

मनुका पाणी डिटॉक्सिफायरसारखे काम करते. याच्या मदतीने तुम्ही शरीर स्वच्छ ठेवू शकता. यासोबतच हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. मनुकामध्ये अँटिऑक्सिडंट असतात. ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. हे गुणधर्म फ्री रॅडिकल्समुळे होणार्‍या नुकसानापासूनही तुमचे रक्षण करतात.

अॅनिमिया टाळण्यासाठी

बेदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी हे खूप महत्वाचे आहे. रोज मनुका पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाची पातळी राखण्यास मदत होते. म्हणूनच अॅनिमिया दूर करण्यासाठी तुम्ही मनुका पाणी पिऊ शकता.

इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स

त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. हे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स आहेत. इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरण्यासाठी तुम्ही हे पेय रोज पिऊ शकता.

ऊर्जा

उष्णतेमध्ये सामान्यतः लोकांना थकवा जाणवतो. मनुका पाणी प्यायल्याने तुमची एनर्जी लेव्हल वाढते. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. यामुळे आळस दूर होतो. उन्हाळ्यात हे पेय घेतल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहता.

पोटासाठी चांगले

बेदाण्यामध्ये आहारातील फायबर असते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. याच्या मदतीने तुम्ही बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून स्वतःला वाचवू शकता. पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मनुका पाणी पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT