Driving License Types: ड्रायव्हिंग करण्यासाठी आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसेंस असणे आवश्यक असते. कार आणि दुचाकी चालविण्यासाठी कायमस्वरुपीचे लायसन्स देण्यात येत असते. भारतात कार आणि दुचाकी किंवा इतर विविध गाड्या चालविण्यासाठी आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येत असते. ते मिळविण्यासाठी आरटीओच्या विविध नियमांचे पालन करुन त्यासाठी अर्ज व परीक्षादेखील घेतली जात असते.
आपल्या सर्वांना माहित आहे की भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स देशभरातील कोणत्याही राज्यात चालू शकतं. फक्त त्याची मुदत पूर्ण झाल्यावर त्याचे नूतनीकरण करावे लागेल. तुम्हाला माहित आहे का भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सचे किती प्रकार आहेत?,तसेच भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरून तुम्हाला परदेशात गाडी चालवता येते का? आज आपण या संदर्भात जाणून घेऊ. (Driving License Typs: Types of Driving Licenses in India All You need To Know)
ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार
भारतातील रस्त्यांवर कायदेशीररित्या वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक आहे, जो परिवहन विभागाकडून जारी केला जातो. तथापि, यासाठी चाचणी प्रक्रियेतून जावे लागेल, ज्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते.
हे ड्रायव्हिंगसाठी सर्वात महत्वाचे Doccument आहे. जे तुम्हाला कायदेशीररित्या रस्त्यावर वाहन चालवण्याचा अधिकार देते. त्याचबरोबर रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी आता सरकारकडून परवान्याबाबतही कडक केले जात आहे.
यामुळेच रस्त्यावरील वाहतूक पोलिस आधी परवाना मागतात, त्यानंतर इतर कागदपत्रे तपासली जातात. वाहनांच्या विविध वापरासाठी विविध प्रकारचे परवाने आहेत. भारतात किती प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ.
ड्रायव्हिंग लायसन्सचे किती प्रकार आहेत
भारतात चार प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत, ज्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत. हे चार ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे पर्मनंट, कमर्शियल, इंटरनॅशनल परमिट आणि लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स.
शिकाऊ परवाना म्हणजे काय
जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा परवान्यासाठी अर्ज करते तेव्हा शिकाऊ वाहन चालविण्याचा परवाना तयार केला जातो. यासाठी संगणकावर आधारित चाचणी द्यावी लागेल, ज्यामध्ये वाहतूक नियमांशी संबंधित प्रश्न विचारले जातात. (Driving License)
त्यासाठीचे शुल्क जमा केल्यानंतर ते मिळू शकते. मात्र, या परवान्याचा कालावधी केवळ सहा महिन्यांचा असून, शिकाऊ परवाना झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करता येतो.
जर एखादी व्यक्ती शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन गाडी चालवत असेल तर त्याच्यासोबत वैध ड्रायव्हिंग लायसन्स असलेली व्यक्ती असावी. त्याच वेळी, शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स धारकाने त्याच्या वाहनावर लाल रंगात 'L' लिहावे , जेणेकरून इतर ड्रायव्हर्सना कळेल की तुम्ही कार शिकत आहात आणि तुमच्यापासून अंतर ठेवावे. (Driving Tips)
कायमस्वरूपी परवाना म्हणजे काय
हा सर्वात जास्त वापरला जाणारा परवाना आहे. यासाठी लर्निंग लायसन्सच्या एका महिन्यानंतर अर्ज केला जाऊ शकतो, त्यानंतर तुम्ही आरटीओकडून तारीख घेऊन ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. तुम्ही ती चाचणी पास केल्यास तुम्हाला कायमस्वरूपी परवाना दिला जाईल.
व्यावसायिक परवाना म्हणजे काय
व्यावसायिक वाहनांसाठी व्यावसायिक परवाना वापरला जातो, ज्यामध्ये बस, ट्रक, ऑटो आणि इतर वाहनांचा समावेश होतो. यात जड, मध्यम आणि हलकी वाहने अशा तीन श्रेणी आहेत. त्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
आंतरराष्ट्रीय परवाना म्हणजे काय
हा परवाना परदेशात ड्रायव्हिंगसाठी दिला जातो. यासाठी तुमच्याकडे कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. या परमिटची वैधता एक वर्षासाठी आहे. परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी हा परवाना फायद्याचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.