Dussehra 2023 esakal
लाइफस्टाइल

Dussehra 2023 : दसरा संपल्यावर आपट्याची पानं फेकून देताय? आधी त्याचे आयुर्वेदीक फायदे वाचाच

बऱ्याच आजारांवर गुणकारी आहेत आपट्याची पाने, असे करा सेवन

Pooja Karande-Kadam

Dussehra 2023 : आपटा हे एक झाड आहे. आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. या कुलातील झाडांना दोन दले असलेली पाने असल्यामुळे बौहिनिया हे नाव सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन या दोन भावांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे

अश्मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. आपटा पानझडी वनांत आढळणारी झाड आहे. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात.

विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी. हा दिवस दसरा म्हणून पाळला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सोनी म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देत सीमोल्लंघन केले जाते.

आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. (Health Tips)

आपट्याच्या पानांचे आयुर्वेदातील महत्त्व आणि फायदे

  • 4-5 आपट्याची पाने तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळून घ्यावेत. हा एक कप काढा रोज सकाळी उपाशी पोटी पिल्याने साथीचे रोगापासुन आपले रक्षण करतो.

  • चार ते पाच आपट्याची पाने घेऊन तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळुन घ्यावीत. एक कप झाल्यावर जेवण करायचे आधी एक तास हा काढा प्यायल्याने शरीरातील गाठी विरघळून जातात.

  • रोज सकाळी दोन चमचे आपट्याचा रस प्यायल्याने किडनीची स्वच्छता होते,किडनीचे रोग दूर होतात.

  • नियमित आपट्याचा काढा प्यायल्याने लघवी तुंबणे, मुतखडा असणे, या समस्या दूर होतात.

  • आठ ते दहा आपट्याची पाने घेऊन स्वच्छ धुवावीत देठ तोडून टाकावा. बारीक तुकडे करून 3 कप पाण्यामध्ये एक होईपर्यंत उकळावे व एक कप झाल्यावर सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपते वेळेस  नियमित प्यावे   श्वसनाचे आजार व कंठरोग दूर होतात.

  • आपट्याच्या पानांचा काढा कफ व पित्त यांचा नाश करतो.

  • लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास आपट्याची पाने पाण्यात चांगली ओली करून ती नीट वाटून घ्यावीत. जेवढा रस निघेल तेवढ्याच प्रमाणात दूध-साखर टाकावे. हा दिवसातून चार - पाच वेळा घेतल्याने जळजळ कमी होते. 

  • गालगुंड झाली असल्यास आपट्याची साल पाण्यात शिजवून घ्यावीत. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून तो प्यावा किंवा गंडमाळेवर आपट्याची सालं बांधावीत. 

  • आपट्याच्या बियांचे बारीक चूर्ण करून ते तूपात चांगले मिक्स करावे. हे मलम एखादा किटक चावल्यास लावता येते. त्यामुळे दाह कमी होतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT