Dussehra 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Dussehra 2024: यंदा दसऱ्याला तयार होत आहेत अशुभ संकेत, जाणून घ्या कारण, चुकूनही करू नका 'हे' काम

पुजा बोनकिले

Dussehra 2024: शारदीय नवरात्रीला 3 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेच्या रूपाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीनंतर दसरा सण साजरा केला जातो.

हिंदू धर्मात दसऱ्याला खुप महत्व आहे. यंदा 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता असे मानले जाते तर श्रीरामांनी लंकेत जाऊन रावणाचा वध केला होता. यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी वाईट सवयी सोडून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायची शिकवणे देते.

विजयादशमी हा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शुभ कार्ये केली जातात. पण यंदा काही अशुभ योग जुळून आल्याने पुढील गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत.

दसरा कधी आहे?

हिंदू पंचांगानुसार, यंदा दसरा 12 ऑक्टोबरला सकाळी 11: 05 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबरला सकाळी 9: 54 पर्यंत सुरू राहील.

अशुभ का मानले गेले आहे?

तज्ज्ञांच्या मते, हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दसरा साजरा केला जातो. तसेच प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. यंदा दसरा शनिवारी आला आहे. यामुळेच यावेळी दसरा अशुभ मानली गेली आहे. कारण कोणतेही शुभ काम करणे अशुभ मानले गेले आहे.

दसऱ्याला पुढील गोष्टी करणे टाळावे

यंदा दसरा 12 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी साजरा केला जाणार आहे. यामुळे अशुभ योग जुळून आले आहे अशी मान्यता आहे. या दिवशी शुभ गोष्टी करणे अशुभ मानले गेले आहे. यामुळे तुम्ही दसऱ्याला नवीन घरात प्रवेश करण्याचा विचार करत असाल तर असे करणे टाळा. तसेच नवीन वाहने खरेदी करू नका. या दिवशी मुलींना माहेराहून सासरी पाठवू नका. कारण नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight: हवेत असतानाच एअर इंडियाच्या विमानाचा लँडिंग गिअर अडकला! 140 प्रवाशांसह दोन तासांनी सुरक्षित लँडिंग

Pune Rain: अचानक आलेल्या पावसानं पुण्याला झोडपलं! दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची त्रेधातिरपीट

Sayaji Shinde: अभिनेता ते नेता! सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; राष्ट्रवादीत झाला दणक्यात प्रवेश

Prathamesh Parab : लेक एवढा मोठा स्टार असून प्रथमेशचे वडील अजूनही करतात हे काम ; "घरची परिस्थिती हलाखीची तरीही..."

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

SCROLL FOR NEXT