Right way to buy Matka, clean and cure a new Earthen pot Esakal
लाइफस्टाइल

Earthen Pot: उन्हाळ्यासाठी माठाची खरेदी करताना ही घ्या काळजी? Cold Water साठी निवडा योग्य माठ

Earthen pot buying tips: माठ खरेदी करतेवेळी कोणती काळजी घ्यावी. नव्या माठाचा वापर कसा करावा? माठातील पाणी अधिक गार होण्यासाठी कोणत्या ट्रीक्स वापराव्यात या बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत

Kirti Wadkar

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे घशाला वारंवार कोरड पडते. अशात गार पाणी प्यायल्याने मनाला दिलासा मिळतो आणि पोटाला Stomach थंडावा.

मात्र अलिकडे अनेकजण फ्रिजमधलं गार पाणी पिणं पसंत करतात. मात्र फ्रिजमधलं गार पाणी हे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. earthen pot buying tips How do I choose a clay pot for water

फ्रिजमधलं Refrigerator गार पाणी प्यायल्याने घसा तसचं पोटासंबधीच्या समस्या निर्माण होवू शकतात. अशात मग गार पाण्यासाठी Cold Water उत्तम असा नैसर्गिक पर्याय म्हणजे मातीचं मडकं अर्थात माठ. माठातील गार पाण्यामुळे आरोग्यावर कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत.

मातीच्या माठातील पाण्याने शरीराला Human Body फायदाच होतो. यामुळे गार पाण्यासाठी माठ हा सर्वोत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यासाठी अनेकजण माठ खरेदी करतात.

मात्र काहींच्या घरातील माठात पाणी गार होत नाही अशी सतत तक्रार असते. तसचं अनेकदा माठातून सतत पाणी बाहेर येत राहतं. यासाठी माठ खरेदी करतानाच योग्य ती काळजी घेणं आणि निरिक्षण करणं गरजेचं असतं. earthen pot buying tips

माठ खरेदी करतेवेळी कोणती काळजी घ्यावी. नव्या माठाचा वापर कसा करावा? माठातील पाणी अधिक गार होण्यासाठी कोणत्या ट्रीक्स वापराव्यात या बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

नवीन माठ खरेदी करताना घ्यायची काळजी

  • मातीची भांडी ही अधिक टणक होण्यासाठी ती भट्टीमध्ये भाजली जातात. कच्च मातीचं भांड लवकर फुटण्याची किंवा त्याला भेग जाण्याची शक्यता असते. यामुळे माठ खरेदी करताना ते पूर्णपणे भाजलं गेलंय. म्हणजेच तयार आहे याची खातर जमा करून घ्या. 

  • माठ खरेदी करताना ते पूर्णपणे निरखून घ्या. त्यावर एखादी बारीक भेग तर नाही ना हे तपासा. यासाठी तुम्ही बोटाने मटका वाडवून पाहू शकता. बोटाने मटका वाजवून तो टणक आणि भेगाळलेला नाही हे लक्षात येतं.

  • तसचं माठाचं बूड तपासणंही तितकचं गरजेचं आहे. जरी तुम्ही माठ स्टँडवर ठेवणार असाल तरी माठाचं बूड योग्य गोलाकार असणं गरजेचं आहे. 

  • अलिकडे बाजारामध्ये नळ बसवलेले अनेक माठ येतात. मात्र या माठातून नळाच्या जवळून पाणी गळ्याची शक्यता जास्त असते. यासाठी कायम साधा माठ घेणचं जास्त फायदेशीर ठरतं.

    हे देखिल वाचा-

  • याचसोबत बाजारामध्ये नक्षीकाम केलेले फॅन्सी माठही उपलब्ध असतात. मात्र नक्षीकामामुळे या माठामध्ये कुठे दोष तर नाही ना हे तपासणंही कठीण होतं. म्हणूनच साध्या माठाची निवड करावी. 

  • माठ खरेदी करताना तो बाहेरुन जास्त चमकणारं चकचकीत नसावा यासाठी पॉलिशचा वापर केला जातो. असे माठ आरोग्यासाठी योग्य नसतात. 

  • माठ खरेदी करताना ते झाकण्यासाठी मातीचचं झाकणं घेणं जास्त फायदेशीर ठरतं. माठावर मातीचं झाकणं ठेवल्यास पाणी जास्त गार राहण्यास मदत होते. 

  • माठ सिरॅमिकचा घेऊ नये. मातीच्या माठात पाणी जास्त गार राहतं.

माठ खरेदी केल्यानंतर घ्यायची काळजी

  • माठ खरेदी केल्यानंतर तो लगेचच वापरू नये. गार पाण्याने माठ २-३ वेळा स्वच्छ धुवावा. माठ आतून धुताना ब्रश किंवा हाताने घासून धुवू नये. केवळ पाण्याने माठ स्वच्छ करावा. 

  • त्यानंतर शक्य असल्यास पाण्याच्या बादलीमध्ये माठ काही वेळासाठी बूडवून ठेवा. किंवा मडक काही वेळ सतत ओलं ठेवा. यामुळे मडकं पूर्ण ओलावा सोशून घेतं आणि पाणी गार राहण्यास मदत होते.

  • मडकं पाण्याने भरून ठेवल्यानंतर के कधीही उन्हात ठेवू नये. सावलीच्या ठिकाणी माठ ठेवावा. 

  • माठाला कायम एखाद्या स्टॅण्डवर ठेवावं यामुळे माठाच्या बुडाला देखील वारा लागल्याने पाणी अधिक गार होण्यास मदत होते. 

  • माठाला कायम एखाद्या ओल्या कापडाने किंवा एखादं पोतं ओलं करून गुंडाळावं. हे पोतं सतत ओलं करत राहावं. यामुळे माठातील पाणी फ्रिजमधल्या पाण्यासारखं गार राहिलं. 

  • दररोज माठातील पाणी बदलावं 

  • दिवसभर पाणी पिण्यासाठी रात्रीचं माठात पाणी भरून ठेवावं. यामुळे पाणी गार राहिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT