Health Care : काजूला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. काजूमध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. काजू हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनेकांना काजू खायल आवडते. काजूच्या मलईदार रचनेमुळे त्याचा अनेकदा स्वयंपाकघरात आवर्जून वापर केला जातो.
ग्रेव्ही बनवण्यासाठी खास करून काजूंचा वापर केला जातो. काजूच्या भाजीसोबतच काजू सहज म्हणून ही खाल्ले जातात. काजू खाणे हे आरोग्यासाठी चांगले असले तरी ते प्रमाणात खाणे महत्वाचे आहे.
काजूचे अतिसेवन करणे हे अनेक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे असू शकते. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे, अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण काजूचे अतिसेवन केल्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात ? त्याबद्दल जाणून घेऊयात.
काजू आणि बदाम खाणे हे पचनासाठी चांगले मानले जाते. कारण, काजूमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. परंतु, जास्त प्रमाणात काजू खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पोटदुखी, ब्लोटिंग, गॅस आणि डायरिया इत्यादी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, काजूचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा.
काजूचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढण्याचा धोका नाकरता येत नाही. काजूचे अतिसेवन करणे वजन वाढीला आमंत्रण देऊ शकते. १०० ग्रॅम काजूमध्ये ५५३ कॅलरीजचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही काजू जास्त प्रमाणात खाता तेव्हा तुमच्या शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे, वजन वाढू शकते.
या कॅलरीज कमी करण्यासाठी तुम्हाल व्यायाम करावा लागेल आणि व्यायाम करून तुम्हाला या कॅलरीज कमी कराव्या लागतील. जर कॅलरीज कमी नाही झाल्या तर तुमचे वजन वाढू शकते.
काजूचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोनची (मुतखडा) समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. याचे कारण म्हणजे काजूमध्ये ऑक्सलेटचे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, जेव्हा काजूचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते, तेव्हा या ऑक्सलेटमुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.
जर तुमच्या कुटुंबात किडनीस्टोनची समस्या असणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांना काजूचे अति सेवन करण्यापासून रोखा आणि इतरांनी देखील काजूचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.