लाइफस्टाइल

Burned Tongue : गरम खाण्यामुळे जीभ भाजली? हे घरगुती उपाय केल्यास मिळेल 5 मिनिटांत आराम

जीभ भाजल्यावर करा 'हे' उपाय, जाणून घ्या

Aishwarya Musale

अनेक वेळा घाईत आपण गरम पदार्थ खातो किंवा गरम पेय पितो आणि आपली जीभ भाजते. गरम चहा प्यायल्याने जीभ भाजल्याचं तर अनेक जणांनी अनुभवलं असेल. जीभ भाजली की आपल्याला खाताना, पिताना किंवा बोलताना त्रास होतो. ही एक गंभीर समस्या नाही.

जीभ भाजली की सामान्यत: आपण लगेच थंड पाणी पितो. पण जर तुम्हाला त्याचा त्रास जास्त होत असेल तर येथे दिलेल्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही आराम मिळवू शकता.

1. दही

जीभ भाजली असेल तर दही खाणे फायदेशीर आहे. याच्या थंडावाने आराम मिळतो, म्हणून जेव्हा जेव्हा जीभ भाजते तेव्हा फक्त एक चमचा दही घ्या आणि काही वेळ तोंडात ठेवा.

2. बेकिंग सोडा

चिमूटभर बेकिंग सोडा अनेक समस्यांवर उपाय आहे. त्याच्या एल्काइन नेचरमुळे खूप आराम मिळतो. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून घ्या आणि नंतर गुळण्या करा.

3. साखर

जीभ भाजल्यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी चिमूटभर साखर देखील खूप प्रभावी आहे. तोंडात साखर टाका आणि ती स्वतःच विरघळू द्या. पाणी पिण्याची गरज नाही. असे केल्याने जळजळ आणि वेदनांपासून खूप आराम मिळेल.

4. मध

मध चाटल्याने जिभेच्या जळजळीतही आराम मिळतो. कारण ते अँटीसेप्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.

5. एलोवेरा जेल

कोरफडीच्या वापरामुळे जीभेच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळतो. त्याचे जेल कूलिंग इफेक्ट प्रदान करते. एलोवेरा जेलचे आइस क्यूब बनवा. हे अनेक समस्यांवर प्रभावी आहे. जिभेवर लावण्याव्यतिरिक्त, तुम्ही त्वचेच्या काळजीमध्ये देखील वापरू शकता.

6. साधे अन्न खा

जीभ भाजली असल्यास, शक्य तितके साधे अन्न खा. खूप मसालेदार अन्न टाळा. साधे अन्न पोट थंड ठेवते त्यामुळे जीभ लवकर बरी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: नवं गृहनिर्माण धोरण अन् मुलांना मोफत शिक्षण... शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा जाहीर

Shreyas Iyer चे द्विशतक! BCCI अन् KKR ला करारा जवाब; सिद्धेश लाडसोबत विक्रमी ३०० धावांची भागीदारी

कमी वयातच दूरदृष्टी कमी झाली असेल डोळ्याची; तर चष्माच नंबर घालवण्यासाठी करा ह्या फळांचा सेवन

Chitra Wagh : महायुती पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 'इतके' रुपये देणार; चित्रा वाघ यांची मोठी घोषणा

लाडक्या मालिकेतील अभिनेत्रीबरोबर काम करणार अशोक मामा ; या स्टारकिडचीही लागली वर्णी

SCROLL FOR NEXT