Monsoon Electric Vehicles Care esakal
लाइफस्टाइल

Electric Vehicles Care : पावसाळ्यात Electric गाड्यांची काळजी कशी घ्यायची?

Monsoon Vehicles Care Tips: चार्जिंग करतांना काय काळजी घ्यावी?

Pooja Karande-Kadam

Electric Vehicles Care : देशभरात मान्सून सुरू झाला असून, उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळाला आहे. परंतु हा हंगाम अनेक लोकांसाठी चिंताजनक बनला आहे, कारण पावसामुळे रस्ते, तळघर पार्किंग आणि इतर ठिकाणी तुंबून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. बऱ्याच वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांकडे दुर्लक्ष करत होत्या. त्याच कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करू लागल्या आहेत.(Electric Vehicles Care : Safeguard Your Electric Car During the Rainy Season Tips for Protection and Maintenance)

इलेक्ट्रिक कारसाठी ही समस्या अधिक वाढते आणि त्यामुळे वाहनाचे अधिक नुकसान होते. अशा परिस्थितीत तुम्हीही इलेक्ट्रिक कार चालवत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही पावसाळ्यातही तुमचे इलेक्ट्रिक वाहन सुरक्षित ठेवू शकता.(Electric Vehicle)

चार्जिंग डिव्हाइस सुरक्षित ठेवा

पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी चार्जिंग उपकरणे सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या घराबाहेर चार्जिंग स्टेशन लावले असेल किंवा पोर्टेबल चार्जर वापरला असेल, तर त्यातील पाणी शॉर्ट सर्किट होऊन तुमच्या वाहनातील आवश्यक उपकरणे खराब करू शकते.

चार्जिंग करतांना घ्यावी काळजी

पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांचे बॅटरीचे चार्जिंग करतांना खास काळजी घेणे गरजेचे आहे. जर पाऊस पडत असेल तर व्यवस्थित झाकलेल्या आणि कोरड्या भागात चार्जिंग करावे. चार्जिंगसाठी प्लग करण्यापूर्वी, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी वाहन प्लग कोरडा आहे ना याची काळजी घ्यावी.

बॅटरीचे आरोग्य तपासा

कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी. त्यामुळे त्याची गळती, इन्सुलेशन किंवा कनेक्टर वेळोवेळी तपासा. कारण कधी-कधी उंदीरही नुकसान करू शकतात. त्यामुळे वाहनाच्या विद्युत भागांमध्ये पाणी गेल्यास खूप नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत काही गडबड दिसली तर ताबडतोब वाहन सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. (Battery)

गाडीच्या आतील भाग स्वच्छ ठेवा

कारच्या बाहेरील भागाइतकाच आतील भागही महत्त्वाचा आहे. त्यामुळे कारचा आतील भाग नेहमी स्वच्छ ठेवा कारण कारमधील पाणी किंवा ओलावा इलेक्ट्रिक पार्ट्समध्ये बिघाड निर्माण करू शकतो. पार्क केलेल्या वाहनात नेहमी दारे आणि खिडक्या व्यवस्थित बंद ठेवा आणि गळती होत नाही याची तपासणी करत रहा.

पाणी भरलेल्या रस्त्यावर वाहन चालवू नका

जास्त पाणी साचलेल्या रस्त्यावर तुमचे इलेक्ट्रिक वाहन नेऊ नका. ईव्हीमध्ये भरपूर संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सर असल्यामुळे ते पाण्यामुळे खराब होऊ शकतात. तसेच, तुमच्या वाहनाच्या बॅटरी पॅकचे आयपी रेटिंग जाणून घ्या. बहुतेक नवीन ईव्ही चांगल्या IP रेटिंगसह येतात आणि आवश्यक भाग चांगले सील केलेले असतात. तथापि, ते खराब झाल्यास, ते आपल्या वाहनासाठी गंभीर धोका बनू शकते.

वाहनाचे संरक्षण कसे करावे

वाहन विमा हा केवळ पावसाळ्यातच नाही तर वर्षभर इलेक्ट्रिक वाहनांच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनाला आग लागल्यास किंवा अपगात झाल्यास तुम्हाला आर्थिक मदत मिळते. यामुळे विमा काढणे गरजेचे असते.

टायर्सची काळजी घ्या

पावसाळ्यात वाहनांच्या टायर्सवर सर्वात जास्त परिणाम होतो. पाण्यात गेलेले खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे गाडीचे टायर्स आपटले जातात. त्यामुळे टायर्स फुटण्याची जास्त शक्यता असते. तसेच रस्ते निसरडे झाल्याने गाडी स्लीप होण्याचीही भिती असते. तेव्हा पावसाळ्याआधीच गाडीची कामे करून घ्या. तिचे टायर्स बदलून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT