उद्योजकतेला बळ sakal
लाइफस्टाइल

उद्योजकतेला बळ

गेल्या वर्षी ‘शी लीड्स इंडिया’ या ग्रुपची स्थापना झाली. सुरुवातीला पाच सदस्य मिळून या ग्रुपच्या कामाला सुरुवात झाली आणि पुढे याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत गेला.

सकाळ वृत्तसेवा

मधुरांगण

निकिता वोरा (संस्थापिका, शी लीड्स इंडिया)

गेल्या वर्षी ‘शी लीड्स इंडिया’ या ग्रुपची स्थापना झाली. सुरुवातीला पाच सदस्य मिळून या ग्रुपच्या कामाला सुरुवात झाली आणि पुढे याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत गेला. या ग्रुपचा मूळ उद्देश आहे तो म्हणजे महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटली वाढवण्यासाठी मदत करणे. ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलावर ते आईच्या पोटात असल्यापासून संस्कार होत असतात त्याचप्रमाणे एखादा व्यवसाय सुरू करताना पहिल्यांदा सुचलेली कल्पना आणि त्यावर नंतर केलेले काम मग अगदी त्याचे नाव, लोगो, सोशल मीडिया, क्रिएटिव्ह्‌ज, विविध वेबसाईट, प्रशिक्षणे आणि तो व्यवसाय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शक्य ते सर्व संस्कार तुम्हाला व्यवसायाची वाढ होताना करायचे असतात. त्यासाठीच ‘शी लीड्स इंडिय’ महिला उद्योजकांना मदत करते.

हा फेसबुक ग्रुप आहे. यामध्ये पन्नास हजारांहून अधिक महिला समाविष्ट आहेत. २०१७ मध्ये ‘वुमन्स wave’ नावाचा ग्रुप होता. कालांतराने त्या ग्रुपचा विस्तार वाढला व त्याचे रूपांतर ‘शी लीड्स इंडिया’ ग्रुपमध्ये झाले. आमच्या ग्रुप मीटिंग्ज होतात, त्या दरम्यानच अनेक व्यवसायांबाबत देवाणघेवाण आणि संवाद होतात. मी आत्तापर्यंत जी काही ट्रेनिंग्ज दिलेली आहेत, त्यामुळे महिलांचे व्यवसाय वाढण्यास मदत झाली आहे. या अंतर्गत महिलांना त्यांच्या व्यवसायासंदर्भात अनेक वेबसाईट तयार करून दिल्या आहेत. त्यामुळे महिला उद्योजकांचा व्यवसाय वाढला आहे. प्रत्यक्ष मार्गदर्शनामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम झाला आहे. व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी खूप मदत झाली आहे. भविष्यात एक लाख महिला उद्योजकांपर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा आहे.

मला महिलांना प्रशिक्षण द्यायचे आहे. त्यांच्याच व्यवसायाची वेबसाईट बनवून त्यांचा व्यवसाय छोटा नव्हे तर खूप मोठ्या स्तरावर जाऊ शकतो हे दाखवायचे आहे. तसेच सरकारच्या अनेक योजनांविषयीची माहिती या माध्यमातून देण्याचे काम आम्ही करतो. व्यवसाय, व्यवसायाची कल्पना, भांडवल, प्रशिक्षण, मार्गदर्शन, डिजिटल वाढ होण्यासाठी वेबसाईट, समाजमाध्यमांवर त्यांचे अस्तित्व यापैकी काहीही महिलांना हवे असेल, तर त्या ‘शी लीड्स इंडिया’ला कनेक्ट करू शकतात. वैशिष्ट्य म्हणजे आमच्या ग्रुपला कोणतीही महिला कधीही जॉईन करू शकते. मग ती गृहिणी असो, विद्यार्थिनी असो वा व्यावसायिक असो. आमच्याकडे कल्पना मांडण्यापासून ती वाढवण्यापर्यंत डिजिटल सपोर्ट दिला जातो.

कोणत्याही बिझनेस नेटवर्किंग ग्रुपमध्ये व्यवसाय सुरू करताना प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक किंवा त्याचे कनेक्शन कसे होतील याचाच विचार करत असते; परंतु बेसिक ट्रेनिंगचा विचार करत नाही. मला प्रत्येकीला हेच सांगावे वाटते, की ट्रेनिंगवर फोकस करा. त्यामुळे व्यवसाय आपोआप वाढतो. तुम्हाला बाकी गोष्टी आपोआप कळायला लागतात. तसेच तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला स्वतःला कशा प्रकारे प्रेझेंट केले पाहिजे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी अगदी तुम्ही कपडे कसे, कोणत्या रंगाचे परिधान करावेत, कसे बोलावे या लहान लहान गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत. या सर्व गोष्टींवर ‘शी लीड्स’मध्ये प्रशिक्षण दिले जाते. आमच्या ग्रुपअंतर्गत विविध प्रशिक्षणे होत असतात, त्यासाठी एक मेंबरशिप ठरलेली आहे. त्यासाठी ठराविक रक्कम भरून ती मेंबरशिप घ्यावी लागते व त्यानुसार पुढे मार्गदर्शन केले जाते.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT