College bench Sakal
लाइफस्टाइल

कॉलेजचा बेंच अन् बरचं काही...

विकास देशमुख

कॉलेज आजही आहे तिथंच आहे. त्याच्या रस्त्यावरील गुलमोहराची पानगळ होते, तसा दरवर्षी नवा बहरही येतो. कॉलेज पूर्वीसारखंच फुलतं, खुलतं. तिला पाहून आजही त्याचं मन बहरतं. फक्त दरवर्षी त्या बेंचवर दुसरं कुणी तरी बसतं...

कॉलेज सुटतं. आयुष्यात स्थिरावण्याचा प्रयत्न सुरू होतो. तरीही कॉलेजच्या मोरपंखी आठवणी मनात रुंजी घालतात. आठवतो तो मित्रांसोबत शेअर केलेला बेंच. बोअर झालेल्या पिरिअडमध्ये उगाचच त्या बेंचवर गिरवलेल्या चंद्रशेखर गोखले, ज्ञानेश वाकुडकर, अशोक थोरात यांच्या कविता. तिथेच मांडलेला फुल्ली-गोळ्याचा डाव.

आपल्याला आवडणाऱ्या तिचं किंवा त्याचं काढलेलं नाव; तर कधी उगाचच खोडी म्हणून दिलच्या चिन्हात लिहिलंलं त्या दोघांचं नाव. त्यावर प्राचार्यांकडे झालेली तक्रार अन् कानाचे पडदे फाटेस्तोर ऐकून घ्यावं लागलेलं लेक्चर. परीक्षेच्या काळात कोणत्या बेंचवर आपला नंबर येणार ते आदल्याच दिवशी हुडकून शिपायाला फूस लावून त्या बेंचवर लिहिलेले उत्तराचे मुद्दे असं बरंच काही काही.

कॉलेजच्या आयुष्यात प्रत्येकाचाच सख्खा मित्र असतो बेंच. कुणाचा अगदी पहिल्या रांगेत सर्वांत पुढचा, कुणाचा मधल्या रांगेतला तर कुणाचा अगदी शेवटचा. कोण कुठल्या बेंचवर बसतं यावरून त्यांचा स्वभावसुद्धा लक्षात येतो. अगदी पुढे बसणारे नम्र असतात. नाकाच्या दिशेनं चालणारे. दिलेलं होमवर्क करणारे. केवळ आपणच कसं टॉप राहू असाच विचार करणारे.

स्वतःला जपणारे. या उलट शेवटच्या बेंचवर बसणाऱ्यांच असतं. ‘अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला’ म्हणत ते टरेलक्या करतात. कुणाचे केस ओढतात, कुणाला दगड-खडू मारतात. सरांची खिल्ली उडवतात. जणू हे सगळं करण्यासाठीच ते या जागेवर बसतात की काय असं वाटतं; पण वरकरणी ते जरी खोडकर असले तरी ते इतरांच्या मदतीला धावून जातात.

आपण केलेल्या खोड्यातून आपल्या इतर मित्रांचं मनोरंजन कसं होईल, हे ते पाहत असतात. मधल्या रांगेत बसणारे बिच्चारे खरोखरच अधले-मधलेच असतात. कधी ते अभ्यास करतात तर कधी खोड्या. काही ‘ठस्स’ही याच रांगेत असतात. थोडेसे टवाळखोर, थोडेसे हुशार आणि काहिसे गाढव असं मिश्रण असणारी रांग म्हणजे मधली रांग. एकूणच काय तर बेंचचं अन् आपलं नातं अतूट असतं. दिवसा मागून दिवस गेले.

कॉलेज तिथंच आहे. त्याच्या रस्त्यावरील गुलमोहराची पानगळ होते, तसा दरवर्षी नवा बहरही येतो. कॉलेज पूर्वीसारखंच फुलतं, खुलतं. तिला पाहून आजही त्याचं मन बहरतं. फक्त दरवर्षी त्या बेंचवर दुसरं कुणी तरी बसतं. आता त्या बेंचवर फुल्ली-गोळ्याचा डाव कुणी मांडत असेल का? नसेलच कदाचित.

आता बेंचवर मोबाइल ठेवून त्यात डोळे खुपसून रिल बघितल्या जात असतील. क्लासच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यातील ती-तो डोळ्यांनी नाही तर मेसेजवर बोलत असतील. वहीत चिठ्ठी तर दिलीच जात नसेल. इन्स्टा, शेअर चॅटवरच, ‘कुछ मेरे दिल ने कहाँ, कुछ तेरे दिल ने कहाँ ’ होत असेल. पण, बेंच मात्र तोच असेल...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT