Explore Karnataka esakal
लाइफस्टाइल

Explore Karnataka : भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळखलं जातं हे ठिकाण, मंदिरे, ऐतिहासिक वारसा अन् बरंच काही, कधी जाताय फिरायला?

Karnataka best places : बंगळुरूपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे. तुम्ही केवळ दोन दिवसाच्या ट्रिप मध्ये सुद्धा ही संपूर्ण ठिकाण एक्सप्लोर करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Karnataka best places :  

जगात अशी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत जिथे जाणं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. त्यात स्विझर्लंड, पॅरिस, इंग्लंड या देशातल्या ठिकाणांचा समावेश असेल. पण आपला भारतही काही कमी नाहीये. अफाट निसर्गसौंदर्य लाभलेल्या आपल्या भारताला लोक आजकाल विसरत चालले आहेत.

आपल्या भारतातही अनेक वन्य संग्रहालय आहेत. जिथे आपल्याला थ्रील अनुभवता येईल. भारतातल्या बंगळुरू पासून जवळ असलेल्या एका ठिकाणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जे ठिकाण प्राणी मित्रांसाठी स्वर्ग आहे. आणि निसर्गसौंदर्य आवडणाऱ्या लोकांसाठी एक वेगळी अनुभूती मिळणार ठिकाण आहे.

तुम्ही जर ऑफिस ट्रीपसाठी बंगळुरूला गेला असाल तर तिथून कोडागु कुर्ग हा ट्रिप प्लॅन नक्की करा. कारण इथे अनेक धार्मिक पर्यटन स्थळ, अभयारण्य, ऐतिहासिक स्थळ आहेत. बंगळुरूपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे.

जिथे जाण्यासाठी तुम्हाला चार-पाच दिवस वाया घालवावे लागणार नाही. तुम्ही केवळ दोन दिवसाच्या ट्रिप मध्ये सुद्धा ही संपूर्ण ठिकाण एक्सप्लोर करू शकता.

तुम्हाला निसर्गाशी एकरूप व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणाचा विचार करू शकता. कारण निसर्ग सौंदर्याने भरलेलं हे ठिकाण वन्यजीव, शांतता, आणि पहाल तिकडे हिरवळ हेच दिसणार आहे.

मंडलपट्टी पॉइंट

मंडलपट्टी शब्दाचा अर्थ ढगांचा बाजार असं होऊ शकतो. समुद्रसपाटीपासून 4050 फूट उंच हा डोंगर आहे. हा डोंगर पुष्पग्री रिझर्व फॉरेस्टचा भाग आहे. या पॉइंटवरून ढगात बुडालेलं डोंगरदऱ्या तुम्हाला अनुभवता येते.

मंडलपट्टी पॉइंट

एबी फॉल्स

कुर्गला भारताचा स्कॉटलंड म्हणून देखील ओळखले जाते. कुर्गमध्ये एबी फॉल्स नावाचा एक सुंदर धबधबा आहे. ब्रिटिश काळात या धबधब्याला जेसी फॉल्स असे म्हटले जात होते. अनेक पर्यटक या धबधब्याला भेट देतात. धबधब्यामध्ये भिजून झाल्यानंतर ताज्या ताज्या चहा-कॉफीचा आनंद घेऊन पर्यटक मंत्रमुग्ध होतात.

कुर्ग मधील नामद्रोलिंग मंठ

कुर्ग हिल स्टेशन पासून 34 किलोमीटर अंतरावरती नामद्रोलिंग मठ आहे. ज्याला स्वर्ण मंदिर असेही म्हटलं जातं. बौद्ध धर्माचे शिक्षण देणारे हे मोठे गुरूकूल आहे.

महाराजांची खुर्ची

महाराजांची खुर्ची नावाचे एक गार्डन कुर्गमध्ये पाहायला मिळते. जी तिच्या सौंदर्यतेने नटलेली आहे. इथे अनेक ऐतिहासिक ठिकाणेही आहेत. या ठिकाणावरती एक बागीचा असून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कारंजे आहेत. इथे तुम्हाला सनसेट आणि सनराइज दोन्हीचाही आनंद घेता येईल.

महाराजांची खुर्ची बागिचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT