Face Beauty Tips esakal
लाइफस्टाइल

Face Beauty Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्यांची झालीय गर्दी? या टिप्स येतील कामी!

How to Get Rid of Wrinkles: तरूणपणी सुरकुत्या पडण्याला या गोष्टी आहेत कारणीभूत

Pooja Karande-Kadam

Face Beauty Tips : खरं तर त्वचेची योग्य वेळी काळजी घेण्यास सुरुवात केली तर त्वचा वर्षानुवर्षे तरूण आणि चमकदार राहते. परंतु, वेळीच त्वचेची काळजी न घेतल्याने सुरकुत्या लवकर चेहऱ्यावर दिसतात. सुरकुत्या म्हणजे त्वचा सैल पडून तिचे वेगवेगळे पदर दिसू लागतात.

ज्यावेळी आपले वय वाढू लागते तेव्हा सामान्यत: सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या मुख्यत्वेकरुन चेहर्‍यावर दिसू लागतात. त्यानंतर हळू हळू सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणारे अवयव जसे कि मान, गळा, हात अशा ठिकाणी दिसू लागतात.

डॉक्टरांच्या मते, सुरकुत्या येण्याचे एकमेव कारण म्हणजे तुमच्या त्वचेत कोलेजेन आणि इलास्टिन नावाच्या प्रथिनांची कमतरता असणे होय. परंतु वाढत्या वयाबरोबर ही एक सामान्य घटना आहे. काही काळापूर्वी सुरकुत्या हे तुमच्या वाढत्या वयाचे वैशिष्ट्य होते.

बदलत्या जीवनशैलीमुळे ३० ते ३५ वयोगटातील लोकांमध्ये सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. आजकाल तरुणांसाठी सुरकुत्या ही मोठी समस्या आहे. याचे कारण चेहऱ्यावर रासायनिक उत्पादनांचा वापर आणि वातावरणातील बदल होय.

सुरकुत्या येण्यामागील कारणं (Causes of Wrinkles)

  • वाढते वय

  • दिवसभर उन्हात राहणे

  • धूम्रपान किंवा मद्यपान

  • पाणी कमी पिणे

  • अनुवंशिकता 

तुम्हीही चेहऱ्यावरील सुरकुत्यांनी त्रासलेले असाल तर काही उपाय करून तुम्ही त्यातून सुटका मिळवू शकता. (how to get rid of wrinkles)

सनस्क्रीन वापरा

सूर्यप्रकाशात आल्यावर सनबर्न होऊ शकतो, सूर्याची किरणे तुमच्या त्वचेतील कोलेजनचे विघटन करतात, त्यामुळे उन्हाळा असो किंवा हिवाळा, सनस्क्रीन वापरा. सनस्क्रीनसोबत मॉइश्चरायझर वापरा. मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवते.

अंडी

अंड्याच्या वापरामुळे चेहर्‍यावर चमक आणण्यास मदत होते. जर अंड्याच्या पांढर्‍या भागाने सुरकुत्या पडलेल्या भागावर मालिश केली असेल तर सुरकुत्या पडलेल्या त्वचेत खूप फायदा होतो.

अंड्याचा पांढरा भाग त्वचेचे उघडलेले छिद्र घट्ट करतात. यामुळे सैल झालेली त्वचा पुन्हा पूर्ववत होऊ लागते . सुरकुत्या झालेल्या त्वचेसाठी खासकरून हे एक उत्तम फेस पॅक आहे. हा पॅक आठवड्यातून दोनदा वापरला जाऊ शकतो. 

जास्त टेन्शन घेऊ नका

असं म्हणतात की आधी तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसू लागतं. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीर अधिक कॉर्टिसोल हार्मोन तयार करते, जे कोलेजनचे विघटन करते.

त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. जास्त ताण न देण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढा.

भरपूर पाणी प्या

सुरकुत्या कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. तुम्ही दिवसभरात 10 ते 15 ग्लास पाणी प्या. पाणी आपल्या शरीरातील विषारी घटक देखील काढून टाकते.

पूर्ण झोप घ्या

ज्याप्रमाणे जास्त टेन्शनचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो, त्याचप्रमाणे झोपेच्या कमतरतेचाही परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. म्हणूनच पूर्ण झोप घ्या, तुम्ही किमान ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे.

आरोग्यदायी आहार

सुरकुत्या कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार घ्या. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, जीवनसत्त्वे समृद्ध फळांचा समावेश करा. फक्त ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा. याशिवाय तुम्ही घरगुती फेस पॅक वापरू शकता.

गुलाबजल वापरा

आपण कामानिमित्त उन्हात किंवा सूर्यप्रकाशामध्ये जास्त काळ राहिलो तर त्याचा चेहर्‍यावर परिणाम दिसू लागतो. यावर गुलाबपाणी लावणे हा बेस्ट ऑप्शन आहे.

गुलाबपाणी फ़्रीझर मध्ये ठेवा. ते गोठल्यावर सुरकुत्या झालेल्या जागी त्याचे क्युब्स फिरवा. हे शक्य तितक्या जास्त वेळेस करा. अगदी रोज करायला हरकत नाही. हे शक्य नसल्यास, गुलाबपाणी मुलतानी मातीमध्ये मिसळून त्याचा लेप चेहर्‍यावर लावा.

चंदन पावडर

चंदन पावडर केवळ अ‍ॅंटी-एजिंगची समस्याच दूर करत नाही तर चेहर्‍यावरील मुरुमही दूर करते. चंदन पावडर गुलाबाच्या पाण्यात किंवा हळदीमध्ये मिसळा आणि चेहर्‍यावर लावा आणि 10-15 मिनिटांनी पाण्याने धुवा.  आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला स्वत:कडे पुरेसे लक्ष द्यायला जमतेच असे नाही.

आपल्या शरिरामध्ये मात्र बदल होत राहतात. अश्यावेळी आपण वर दिल्याप्रमाणे छोटे छोटे उपाय करुन पाहू शकतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT