Fennel Seeds Face Pack esakal
लाइफस्टाइल

Fennel Seeds Face Pack : माऊथ फ्रशनर असेलेली बडिशेप उजळवेल त्वचा, कशी ते जाणून घ्या

सामान्यतः माऊथ फ्रेशनर म्हणून जेवणानंतर बहुतेक जण खातात. पण यामुळे ५ प्रकारचे फेसपॅकही बनवता येतात.

धनश्री भावसार-बगाडे

How To Make Face Pack From Fennel Seeds : सामान्यतः माऊथ फ्रेशनर म्हणून जेवणानंतर बहुतेक जण खातात. असं म्हणतात की, पचनक्रिया, पोटाचे विकार दूर करण्यात बडिशेप खाणं फार चांगलं असतं. यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. बडिशेपमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, सी सारखे पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराचे अनेक रोग बरे होण्यास मदत मिळते.

पण तुम्हाला माहितीये का ही बडिशेप स्कीनसाठी पण फार फायदेशीर असते. यापासून तुम्ही ४ प्रकारचे फेसपॅकही बनवू शकतात. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते.

Fennel Seeds Face Pack

बडिशेप, केळ आणि मधाचा फेसपॅक

या फेसपॅकला बनवण्यासाठी आधी बडिशेपची पावडर बनवून घ्या. एका बाऊलमध्ये केळी मॅश करा. थोडंसं मध आणि गिलाबजल मिक्स करा. यात बडिशेप पावडर घाला. ह मिश्राण नीट फेटून घ्या. चेहऱ्यावर लावून १५-२० मिनीटांनी धुवा.

बडिशेप आणि दहीचा पॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी सगळ्यात पहिले १ मोठा चमचा बडिशेप पावडर घ्या. त्यात दही मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. चेहऱ्यावर लावून १५-२० मिनीटांनी धुवा.

Fennel Seeds Face Pack

बडिशेप आणि ओटमील स्क्रब

बडिशेपचा वापर स्क्रबिंगसारखाही करता येतो. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या. बडिशेपची पावडर आणि एक चमचा ओटमील मिक्स करा. त्याला उकळवा. त्याची पेस्ट झाल्यावर कोमट करून चेहऱ्यावर लावा.

बडिशेप फेस टोनर

बडिशेप तुम्ही फेस टोनर म्हणूनही वापरू शकतात. यासाठी एका पॅनमध्ये पाणी घ्या. त्यात बडिशेप घाला. ते उकळवा. ते थंड झाल्यावर गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि चेहऱ्यावर स्प्रे करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT